तबलिगी जमातीच्या बातम्यांचे प्रमाण कमी झाले. कोरोनासंबंधी नवे नवे narratives पुढे येऊ लागले तसे आतापर्यंत मौलाना सादच्या बाबतीत आतापर्यंत झाकून राहिलेले लिबरल मीडिया element त्याला वाचविण्यासाठी पुढे येऊ लागले आहे.
विनय झोडगे
सोशल डिस्टंसिंग पाळू नये. मशिदीत नमाजासाठी जमावे. मरणासाठी मशिदीसारखी पवित्र जागाच नाही, निजामुद्दीन मरकजचा मौलाना साद कंधलावीचे असे विडिओ व्हायरल झाले होते.
मात्र आता मौलाना सादचे तबलिगी जमातच्या अधिकृत यू ट्यूब वाहिनीवरील हेच विडिओ doctered अर्थात छेडछाड करून बनविले असल्याची कहाणी लिबरल मीडिया पुढे आणू लागला आहे. यासाठी बातम्यांची भाषा आणि सूत्रांचा पक्केपणा नेहमीचा आणि ठरीव पद्धतीचा आहे.
ही बातमी लिबरल मीडियात पेरण्याचे timing ही अचूक आहे. तबलिगी मरकजच्या बातम्या मीडियातून कमी झाल्या आहेत. इतर बातम्या आणि narratives पुढे येत आहेत. नेमकी याच वेळी मूळ पुराव्यातील दोषाची बातमी पेरून मौलाना साद विरोधातील पोलिसांची केस कमजोर करण्याचा ही खेळी आहे. आणि ही सुरवात आहे.
सादचा प्रत्यक्ष न्याय प्रक्रियेतून न्याय होण्यापूर्वी मीडिया ट्रायलमधून “निर्दोष” ठरविण्याची ही पहिली पायरी आहे. नजीकच्या भविष्यात विविध बातम्या पेरून मौलाना सादच्या innocence विषयी लोकांची खात्री पटविण्याचे प्रयत्न केले जातील. याची ही नांदी आहे.
मौलाना सादचे खरे विडिओ दिल्ली पोलिसांना सापडलेच नाहीत. ज्या २०० – ३०० ऑडिओ आणि रॉ विडिओ फाईल्स सापडल्या आहेत, त्या doctored अर्थात छेडछाड करून यू ट्यूबवर टाकलेल्या आहेत, असा दावा पोलिसांमधील highly placed sources च्या आधारे करण्यात आला आहे. हा पोलिसांच्याच काठीने पोलिसांना मारून मौलाना सादला पोलिसांच्या कचाट्यातून अलगद सोडवून आणण्याचा डाव आहे.
बातमी अशी पेरली आहे, की कोठेही मौलाना सादच्या आधीच्या, नंतरच्या कृत्याचा तिच्यात उल्लेख नाही. मौलाना सादने जमविलेल्या संपत्तीचा, निजामुद्दीन मरकज बेकायदा असल्याचा, तो सध्या कुठे आहे, याचा उल्लेखही नाही. मौलाना साद नेमका कुठे आहे, हे बातमीतील highly placed sources ना माहिती नाही.
मात्र त्याच्या सापडलेल्या ऑडिओ, विडिओ फाईल्स doctored असल्याची माहिती त्यांना आहे. मौलाना सादच्या मरकजमधील काही अनुयायांनीच हे कृत्य केल्याचीही पक्की खबर त्यांना आहे. highly placed sources च्या बातम्यांचे स्वरूप असे selective आहे.
जर सापडलेल्या फाईल्स doctered आहेत? तर मौलाना साद हा निजामुद्दीन मरकजमधून पळून का गेला? पोलिसांसमोर येऊन तो हजर का नाही झाला? पोलिसांनी काढलेल्या नोटिसांना तो मोघम उत्तरे का देतो? या प्रश्नांची उत्तरे मात्र लिबरल मीडियाच्या narrative मध्ये सापडत नाहीत.