• Download App
    महाराष्ट्राने आदर्श घ्यावा असा, योगी आदित्यानाथांचा ट्रबल शुटर अधिकारी | The Focus India

    महाराष्ट्राने आदर्श घ्यावा असा, योगी आदित्यानाथांचा ट्रबल शुटर अधिकारी

    महाराष्ट्रातील अनेक अनुभवी प्रशासकीय अधिकारी चीनी व्हायरसच्या संकटाविरुध्द लढताना चाचपडत आहेत. मात्र, उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचा विश्वास सार्थ ठरवून अवघ्या ३६ वर्षीय आयएएस अधिकार्‍याने नोएडासारख्या हॉटस्पॉट बनलेल्या जिल्ह्याला चीनी व्हायरसच्या संकटातून बाहेर काढले आहे.


    वृत्तसंस्था

    लखनऊ : योगी आदित्यनाथ यांचा आदेश आला आणि एक तासाच्या आत त्याने नोएडाच्या जिल्हाधिकारीपदाची सूत्रे हाती घेतली. निर्णयांचा धडाका लावला आणि चीनी व्हायरसच्या संकटापासून नोऐडा शहराला वाचवून योगींचा विश्वास सार्थ ठरविला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील पॅराशुटर असलेल्या सुहास यथीराज यांनी ही किमया करून दाखविली आहे.

    चीनी व्हायरसविरोधातील लढाईत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मंत्रालयात बसून नाहीत तर प्रत्यक्षात रस्त्यावर उतरले आहेत. वडीलांच्या अंत्यसंस्कारापेक्षा राज्यातील जनतेची काळजी त्यांना महत्वाची वाटते. काही दिवसांपूर्वी त्यांनी नोएडा या चीनी व्हायरसने ग्रस्त शहराला भेट दिली होती. येथील जिल्हाधिकार्‍याच्या गलथानपणामुळे चिडलेल्या योगींनी बैठकीतच कारवाई करून या जिल्हाधिकार्याला दीर्घ मुदतीच्या सुटीवर पाठविले.

    मात्र, केवळ ऐवढे करून भागणार नव्हते. या ठिकाणी एखादा धडाकेबाज अधिकारी आणण्याची गरज होती. त्याप्रमाणे त्यांनी आता आयएएस अधिकारी असलेले भारताचे आंतरराष्ट्रीय स्पर्धांत प्रतिनिधीत्व केलेले पॅराशुटर सुहास यथीराज यांच्याकडे नोएडाच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी स्वीकारली. योगींचा आदेश मिळताच एक तासाच्या आत यथीराज नोएडात दाखल झाले. पहिल्याच दिवशी त्यांनी संपूर्ण शहराचा अभ्यास केला आणि ज्या कंपनीतून चीनी व्हायरसचा प्रसार झाला ती कंपनी सील केली.

    व्हायरस प्रादुर्भावाची माहिती न देणार्या कंपनीमालकावर गुन्हाही दाखल केला. तातडीने ९०० अधिकार्यांचा समावेश असलेली ३०० पथके तयार केली. नोएडातील सर्व कंटेंन्मेंट झोन त्यांनी सील केले. जीवनावश्यक वस्तूंसाठीही लोकांनी बाहेर पडू नये, त्यांना घरीच सर्व पुरवठा होईल अशी व्यवस्था केली.

    अनेक ठिकाणी अधिकारी करतात ऐवढे आणि त्याचे भांडवल मात्र मोठे करतात. यथीराज यांनी यासंदर्भात कोणतीही पेपरबाजी केली नाही. ऐवढेच नव्हे तर कोणत्याही माध्यमाला मुलाखती दिल्या नाहीत. त्यांच्यापुढे एकच लक्ष्य आहे ते म्हणजे नोएडा जिल्हा चीनी व्हायरच्या प्रादुर्भावापासून मुक्त करणे. त्यांच्या निष्ठापूर्वक कामामुळे केवळ योगी आदित्यनाथ किंवा भारतीय जनता पक्षच नव्हे तर सर्वपक्षीय कार्यकत्यांकडून कौतुक होत आहे.

    यथीराज यांचे जवळचे सहकारी गंगाधर पाटील म्हणतात, सुरूवातीपासूनच यथीराज यांची अत्यंत कडक शिस्तीचा अधिकारी म्हणून ओळख आहे. आग्रा येथे त्यांची पहिलीच जिल्हाधिकारीपदी नियुक्ती असताना काही जण धार्मिक कार्यक्रमांसाठी परवानगी मागायला आले. मात्र, यथीराज यांनी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यास सांगितले. यावर ओरडा करणार्या या लोकांची त्यांनी शांतपणे समजूत काढली. कडक शिस्तीमुळे आत्तापर्यंत यथीराज यांच्या अनेक वेळा बदल्या झाल्या आहेत.

    परंतु, २०१९ मध्ये योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर विश्वास टाकून अलाहाबाद येथील कुंभमेळ्याच्या काळात जिल्हाधिकारीपदी नियुक्ती केली. त्यांनी समर्थपणे ही जबाबदारी पार पाडली. त्यामुळेच योगी आदित्यनाथ यांनी नोएडासारख्या चीनी व्हायरसचे हॉटस्पॉट बनलेल्या जिल्ह्याची जबाबदारी यथीराज यांच्यावर सोपविली आहे.

    Related posts

    एनडीटीव्हीच्या फेक न्यूजने कोट्यवधींच्या आशेला ग्रहण लावण्याचा प्रयत्न; लशीबाबतचे खोटे वृत्त आरोग्य मंत्रालयाने फेटाळले

    कॅनडा पाठोपाठ ब्रिटनने शेतकरी आंदोलनात नाक खुपसले -३६ ब्रिटिश खासदारांनी ब्रिटन सरकारला लिहिले पत्र

    राहुल गांधींच्या नेतृत्वावर पवारांचा वार; यशोमती ठाकुरांचा पवारांवर पलटवार