• Download App
    भारताच्या कुरापती काढू नका; चीनला खणखणीत उत्तर मिळेल | The Focus India

    भारताच्या कुरापती काढू नका; चीनला खणखणीत उत्तर मिळेल

    • मोदी सरकारचा स्पष्ट शब्दांत इशारा
    • सीमेवर शांतता राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, पण देशाचे रक्षण आणि सार्वभौमत्वासाठी काहीही करू

    विशेष प्रतिनधी

    नवी दिल्ली : भारतीय सैन्य तुकडयांनी नियंत्रण रेषा ओलांडल्यामुळे लडाख आणि सिक्कीममध्ये तणाव निर्माण झाला, हा चीनचा आरोप भारताने गुरुवारी फेटाळून लावला. उलट भारतीय सैन्य आपल्या हद्दीत गस्त घालत असताना चीनकडून अडथळा निर्माण केला जातोय. चीनच कुरापती काढतोय, असा आरोप भारताने केला.

    सीमेवर शांतता राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पण देशांच्या सुरक्षा आणि सार्वभौमत्वासाठी सर्व आवश्यक पावले उचलू. यात हयगय होणार नाही, असे भारताने स्पष्ट केले. नियंत्रण रेषेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी हे विधान केले. लडाखच्या गालवान व्हॅली भागात जास्त तणाव आहे. इथे दोन्ही देशांनी अतिरिक्त सैन्य तुकडया तैनात केल्या आहेत.

    लडाखमध्ये सुरु असलेल्या सीमावादात अमेरिकेने भारताला पाठिंबा दिला आहे. या संपूर्ण वादावर पहिल्यांदा अमेरिकेची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. चीनच्या कुरापती कृतीमधून त्यांचा भारताला त्रास देण्याचा हेतू दिसून येतो.

    आग्नेय आशियाची सामुद्रधुनी असो किंवा भारतीय सीमांवरील या चकमकी असोत चीनपासून भारताला असलेला धोका लक्षात येतो असे अमेरिकेने म्हटले आहे. दक्षिण व मध्य आशियासाठीच्या अमेरिकेच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी अ‍ॅलिस वेल्स यांनी ही टीका केली आहे.

    “आग्नेय आशियाची सामुद्रधुनी असो किंवा भारतीय सीमा चीनची आक्रमकता फक्त शब्दांपुरती मर्यादीत नाही. चीनचे चिथावणीखोर आणि दुसऱ्यांना त्रासदायक ठरणारे वर्तन आपण पाहत आहोत. त्यातून चीनला आपल्या वाढत्या शक्तीचा नेमका कसा उपयोग करायचा आहे? हे लक्षात येते.” असे अ‍ॅलिस वेल्स पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.

    Related posts

    एनडीटीव्हीच्या फेक न्यूजने कोट्यवधींच्या आशेला ग्रहण लावण्याचा प्रयत्न; लशीबाबतचे खोटे वृत्त आरोग्य मंत्रालयाने फेटाळले

    कॅनडा पाठोपाठ ब्रिटनने शेतकरी आंदोलनात नाक खुपसले -३६ ब्रिटिश खासदारांनी ब्रिटन सरकारला लिहिले पत्र

    राहुल गांधींच्या नेतृत्वावर पवारांचा वार; यशोमती ठाकुरांचा पवारांवर पलटवार