विशेष प्रतिनिधी
कौलालंपूर : मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांना त्यांनीच स्थापन केलेल्या परती पीरभूमी बेरास्तू मलेशिया या पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. विरोधी पक्षांशी संगनमत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
आपल्या मनातील भारतद्वेष आणि भारतातून पळून गेलेला इस्लामचा प्रचारक झाकीर नाईक याच्या विषयीचे प्रेम यासाठी महाथीर महंमद ओळखले जातात.
महाथीर मोहम्मद यांच्याबरोबरच पक्षातील त्यांचा मुलगा गायक मुखजीर महाथीर आणि त्यांचे अन्य सहकारी यांनाही पक्षातून डच्चू देण्यात आला आहे. यात माजी शिक्षणमंत्री सय्यद सादिक सय्यद अब्दुल रहमान, मझिल मलिक आणि माजी अर्थमंत्री अमीरुद्दीन हमजा यांचा समावेश आहे.
२०१६ मध्ये महाथीर यांनी पक्ष स्थापन केला. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला तरी ते आघाडी सरकारमध्ये सामील झाले. २०१८ मध्ये पंतप्रधान झाले. त्यांनी भारतात आर्थिक घोटाळा करून पळालेल्या इस्लामी प्रचारक झाकीर नाईकला मलेशियात आश्रय दिला.
त्याचे त्यांनी समर्थनही केले. त्यावरून त्यांच्यावर प्रचंड टीकाही झाली. २०१९ च्या शेवटी आघाडीत मतभेद झाल्यावर महाथीर यांना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे लागले. आणि आज त्यांनीच स्थापन केलेल्या पक्षातूनही त्यांना डच्चू देण्यात आला.