भारतीय टीव्ही चॅनल्सवर आता पाकव्याप्त काश्मीरधील हवामानाचा अंदाजही दाखविण्यात येणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असून त्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पुढाकार घेतला आहे. मानसशास्त्रीय युध्द लढण्याचा हा एक भाग असून त्यामध्ये डोवाल हे तरबेज मानले जातात. पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेमध्ये यामुळे भारताबाबत आपुलकीची भावना निर्माण होणार आहे.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतीय टीव्ही चॅनल्सवर आता पाकव्याप्त काश्मीरमधील हवामानाचा अंदाजही दाखविण्यात येणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असून त्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पुढाकार घेतला आहे. मानसशास्त्रीय युध्द लढण्याचा हा एक भाग असून त्यामध्ये डोवाल हे तरबेज मानले जातात. पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेमध्ये यामुळे भारताबाबत आपुलकीची भावना निर्माण होणार आहे.
तीन महिन्यांपूर्वी हा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. ३ फेब्रुवारी रोजी परराष्ट्र आणि गृह मंत्रालयाच्या सचिवांना एक प्रस्ताव पाठवण्यात आला होता. याशिवाय हा प्रस्ताव गुप्तचर यंत्रणा (आयबी) आणि ‘रॉ’लाही पाठवण्यात आला होता. गेल्या आठवड्यातच याला मंजुरी मिळाली. त्यामुळे आता सर्व भारतीय टीव्ही चॅनल पाकव्याप्त काश्मीरचे हवामानाचे अंदाज दाखविणार आहे.
पाकिस्ताव्यवाप्त काश्मीरमधील मिरपूर आणि मुजफ्फराबादसह उत्तरी भागातील गिलगिट बाल्टिस्तानमधील हवामान अंदाजही दाखवावा, असे निर्देश दूरदर्शनला दिले गेले आहेत. याशिवाय काही खाजगी चॅनललाही याबाबतचे निर्देश मिळाले. त्यामुळे खाजगी चॅनलही आता आपल्या बुलेटीनमध्ये बदल करत पीओकेमधील हवामान अंदाज दाखवतील.
पाकिस्तानने पाकिस्तानने जम्मू काश्मीरच्या ८६ हजार चौरस किमी अंतरावर अवैधपणे कब्जा केलेला आहे. दररोज पूर्ण जम्मू आणि काश्मीरचा हवामान अंदाज आता सांगितला जाईल. रोज दिला जाणारा हवामान अंदाज आणि टीव्हीवर दाखवला जाणारा भारताचा नकाशा यामुळे पाकिस्तानला योग्य तो संदेश देईल. पण त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे येथील जनता भारताशी मानसिकदृष्टया जोडली जाणार आहे.
पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये सध्या निवडणुकांवरून गोंधळ सुरू आहे. धक्कादायक म्हणजे पाकिस्तानने आपल्या राष्ट्रीय संसदेत येथील जनतेला प्रतिनिधीत्व दिलेले नाही. त्यामुळे एका अर्थाने पाकव्याप्त काश्मीरचे नागरिक पाकिस्तानचे नागरिक नाहीत. एखाद्या वसाहतीसारखी वागणूक त्यांना मिळत आहे. त्यामुळे येथील जनतेत असंतोष आहे. याच असंतोषाचा फायदा घेऊन येथील जनतेत भारताविषयी आपुलकी निर्माण करण्याचा डोवाल यांचा निर्णय आहे.