चोराच्या मनात चांदणं असतंच, त्यामुळे कधी कधी अनावधानाने सत्य बाहेर येते. पाकिस्तानकडूनही असेच घडले आहे. पाकिस्तान सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर पाकव्याप्त काश्मीरला भारताचा भाग दाखविण्यात आले. अर्थात यावरून इम्रान खान सरकारची टर उडविली गेल्यावर हा भाग काढून टाकण्यात आला.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चोराच्या मनात चांदणं असतंच, त्यामुळे कधी कधी अनावधानाने सत्य बाहेर येते. पाकिस्तानकडूनही असेच घडले आहे. पाकिस्तान सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर पाकव्याप्त काश्मीरला भारताचा भाग दाखविण्यात आले.
अर्थात यावरून इम्रान खान सरकारची टर उडविली गेल्यावर हा भाग काढून टाकण्यात आला. पाकिस्तानने चीनी व्हायरसबाबत माहिती देण्यासाठी एक वेबसाईट बनविली आहे. या वेबसाईटवर ग्राफीकच्या सहाय्याने चीनी व्हायरसच्या संक्रमणाच्या स्थितीची माहिती दिली जात आहे. यामध्ये दाखविण्यात आले आहे की पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे.
हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पाकिस्तानची यथेच्छ टर उडविण्यात आली. ट्विटरवरही पाकिस्तानला ट्रोल करण्यात आले. एका भारतीयाने लिहिले की शेवटी पाकिस्तानने मान्य केले की काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तान या काश्मीरच्या भागात निवडणुका घेण्याचे ठरविले आहे. भारताने याला विरोध केला असून हा भाग भारताचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले आहे