विशेष प्रतिनिधी
मुंबई : कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांच्या गळ्यात अटकेचा आणि चौकशीचा धोंडा आणि मंत्री खोटे बोलला तरी त्याला मात्र सुटकेचा मणिहार, असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अजब कारभार सध्या सुरू आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या या अजब कार्यपद्धतीवर अचूक बोट ठेवले आहे. एबीपी माझाचा प्रतिनिधी राहुल कुलकर्णी याला वांद्र्यातील गर्दीला जबाबदार धरत अटक केली. का तर त्याने म्हणे रेल्वे सुरू होण्याची खोटी बातमी दिली.
आता तर राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी मजूर, कामगारांच्या मोफत प्रवासाची घोषणा केली. आणि नंतर सरकारने घुमजाव केले. यावर टीका करणारे ट्विट आमदार नितेश राणे यांनी केले आहे. राहुलला अटक करता, मी परिवहनमंत्री खोटे बोलल्याबद्दल त्यांना कधी अटक होतीय, याची वाट बघतोय असे हे ट्विट आहे.
हाच प्रकार अर्णव गोस्वामीच्या बाबतीतही लागू होतो. पालघर सेक्युलर लिंचिंग प्रकरणात अर्णवने थेट सोनिया गांधी यांना प्रश्न विचारले म्हणून त्याची न. म. जोशी पोलिस स्टेशनवर बोलवून साडेबारा तास चौकशी केली. वेगवेगळ्या केसेसमध्ये त्याला अडकवले. आणि इकडे मंत्री मात्र बिनदिक्कतपणे घोषणा करून नंतर घुमजाव करताहेत. त्यांच्यावर काडीची कारवाई होत नाहीये. असा हा उद्धवी अजब कारभार आहे.