चीनी व्हायरसच्या संकटापासून मुक्त होण्याच्या दृष्टीने केवळ भावनिक आवाहन व सहानभूतीची विधाने करुन चालणार नाही. व्हायसचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शीघ्र गतीने काही ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केले.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : चीनी व्हायरसच्या संकटापासून मुक्त होण्याच्या दृष्टीने केवळ भावनिक आवाहन व सहानभूतीची विधाने करुन चालणार नाही. व्हायसचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शीघ्र गतीने काही ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केले.
झूम व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संवाद साधताना प्रविण दरेकर यांनी अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर महाराष्ट्र व केरळ मधील रुग्णसंख्या समान होती पण आज महाराष्ट्रामध्ये कोरोना रोखण्याच्या दृष्टीने ठोस व प्रभावशाली नियोजनाच्या अभावामुळे महाराष्ट्र कोरोनो मुळे अधिक धोक्यात आल्याचे दरेकर यांनी म्हटले.
डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णालयीन कर्मचारी यांना आवश्यक पीपीई व अन्य साहित्यांचा योग्य प्रमाणात पुरवठा करण्यात आला नाही. पोलिसांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत आहे, त्यांना संरक्षण देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. अनेक रुग्णालये आजही बंद आहेत. भाजीपाला मंडईमधील गर्दी रोखण्यात प्रशासनाला अपयश आल्यामुळे मुंबईसह ठिकठिकाणी सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाला आहे, अश्या अनेक त्रुटी दरेकर यांनी सरकारच्या निर्दशनास आणून दिल्या.
मुंबईसह मालेगाव, औरंगाबाद आदी भागांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे, ते आटोक्यात आणण्यासाठी आपण अन्य राज्यांपेक्षा कमी पडत असल्याचे निदर्शनास आणून देताना दरेकर यांनी सांगितले की, केरळ व महाराष्ट्रात १५ मार्च रोजी कोरोनाचे २४ रुग्ण होते. पण आज ३० एप्रिल अखेर केरळ मध्ये त्यांच्याकडे ४९७ रुग्ण आहेत तर महाराष्ट्रात हाच आकडा १० हजार ४९८ इतका झाला आहे. अर्थसंकल्पाच्या तुलनेत आरोग्यावर त्यांनी सुमारे ५.५ टक्के इतका खर्च केला आहे. आपण फक्त ४ टक्के खर्च केले. त्यांच्याकडे मृतांचा आकडा केवळ ४ असून आपल्याकडे ४३२ म़ृत पावले आहेत.
झुंबड टाळा अन्यथा कारवाई करावी लागेल, या मुख्यंमंत्र्याच्या विधानावर बोलताना ते म्हणाले की, मुंबईत वांद्रे झालेली गर्दी, महापालिका मंडई मध्ये होत असलेली गर्दी, दोन दिवसांपूर्वी कुर्ल्यामध्ये परराज्यातील जाणा-या मजूरांचे फॉर्म्स वितरित करण्यासाठी काही मंडळीनी काऊंटर्स उघडले होते, त्यासाठी हजारोंची गर्दी जमा झाली होती. भविष्यात असे प्रकारण रोखले पाहिजे, त्यामुळे अश्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे व गर्दी टाळण्यासाठी कडकोट उपाययोजना करण्यात यावी, जेणेकरुन फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडणार नाही