• Download App
    नरेंद्र मोदी तर माझ्या मुलीचे दुसरे पिता | The Focus India

    नरेंद्र मोदी तर माझ्या मुलीचे दुसरे पिता

    •  सरकारच्या प्रतिसादामुळे भारावलेल्या मराठी पित्याची प्रतिक्रीया 
    • इटलीतून 211 भारतीय विद्यार्थ्यांची सुटका

      विशेष प्रतिनिधी
    नवी दिल्ली ः कोरोना विषाणूमुळे चीनपाठोपाठ सर्वाधिक धोकादायक बनलेल्या युरोपातील इटलीमध्ये अडकलेल्या विद्यार्थिनीच्या पित्याची ही कहाणी आहे. सरकार नावाच्या यंत्रणेकडून प्रतिसाद मिळेल, याची आशाही कधी या पित्याने केली नव्हती. त्यामुळे इटलीतून आपली मुलगी सुरक्षित कधी आणि कशी मुंबईत परतणार या चिंतेने त्या पित्याचा जीव पोखरला  जात होता. मात्र त्याच्या आश्चर्याला पारावार उरला नाही, जेव्हा भारत सरकारने त्याला सांगितले, की तुमची मुलगी 15 तारखेला भारतात परत येते आहे.
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दिलेले हे पोकळ आश्वासन नव्हते. तर  सांगितलेल्या तारखेला खरोखरच त्या पित्याची आणि इटलीत अडकून पडलेल्या त्याच्या कन्येची भेट झाली. तीही भारतात. भारत सरकारने दाखवलेल्या या तत्परतेमुळे भारावून गेलेल्या या पित्याचे नाव आहे सुजय कदम. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता कदम कुटुंबियांसाठी पित्यासमान झाले आहेत. सद्गगदित करुन टाकणारा हा अनुभव मुंबईच्या सुजय कदम यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे कदम हे एकटेच नव्हेत. त्यांच्या मुलीप्रमाणेच इटलीत शिकणाऱ्या आणखी 210 विद्यार्थ्यांना भारत सरकारने मायदेशी परत आणण्यात यश मिळवले आहे.
    कदम सांगतात, की  इटलीमध्ये अगदी शंभर टक्के शटडाऊन पुकारला गेला असताना मिलान येथे शिकणारी माझी मुलगी अडकून पडली. मास्टर्स करण्यासाठी ती नुकतीच 4 फेब्रुवारीला इटलीला गेली होती. परंतु, कोवीड-19 म्हणजेच कोरोना विषाणूच्या  उद्रेकानंतर तिचे कॉलेज बंद करण्यात आले. 28 फेब्रुवारीला तिच्याशी संपर्क झाला तेव्हा, सगळे आलबेल असल्याचे तीने सांगितले होते. पुढच्या चार महिन्यांसाठी राहण्याच्या जागेचाही करार तिने केला. मात्र 10 मार्चला अगदी सुपरमार्केटसह सगळंच अचानक बंद झाले. त्यानंतर स्थिती चिघळतच गेली. मिलान शहर बंद झाले. त्यावेळी मी मुलीला भारतात परत येण्यास सांगितले. परंतु, इटली सरकारने तिला भारतात परत जाण्याची परवानगी नाकारली.
    12 मार्चला सुजय कदम यांनी इटली येथील भारतीय दुतावासाशी संपर्क साधला. त्यांना त्यांच्याकडून प्रतिसाद मिळेल, याची जराही खात्री नव्हती. पण काय आश्चर्य. 13 मार्चच्या रात्री इटलीतल्या भारतीय दुतावासातून कदम यांना चक्क फोन आला आणि 14 मार्चला त्यांची मुलगी भारताकडे येणाऱ्या विमानात असेल, असे त्यांना सांगण्यात आले. कदम कुटुंबियांचा क्षणभर यावर विश्वासच बसला नाही. परंतु, ते खऱे ठरले.
    भारत सरकारच्या या प्रतिसादाने भारावलेले कदम आता म्हणतात, की मोदी सरकार हे माझ्या मुलीचे दुसरे पिताच आहेत. खरं सांगायाचं तर मी इतकी वर्षं सरकारला दोष देत आलो. परंतु, संकटाच्या काळात भारत सरकार धीरोदत्तपणे पालकाच्या भूमिकेत माझ्या पाठीशी उभे राहिले. पंधरा मार्चला माझी मुलगी परत आली. इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस हॉस्पीटलमध्ये तिला क्वारंटाईनसाठी ठेवण्यात आलं. माझ्या मुलीच्या औषधोपचार आणि अन्नपाण्याची सगळी काळजी, अगदी घरच्यासारखी मोदी सरकार घेत आहे.
    आनंदी सुजय कदम म्हणतात, की भारतीय दुतावास आणि एयर इंडियाचे मानावेत तितके आभार कमी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्या मुलीचे दुसरे पिता बनले आहेत. त्यांच्यासाठी मी आता स्वयंसेवकाचे काम करीन. परदेशात शिकणाऱ्या इतर मुलांच्या पालकांनाही मी आवाहन करेन, की अजिबात घाबरू नका. एखाद्या पित्याने त्याच्या मुलाबाळांची काळजी करावी, त्याप्रमाणे मोदी सरकार तुमच्यासाठी काम करत आहे. भारतीय दुतावासातर्फे परदेशातल्या सगळ्या भारतीयांची काळजी घेतली जाते.

    Related posts

    एनडीटीव्हीच्या फेक न्यूजने कोट्यवधींच्या आशेला ग्रहण लावण्याचा प्रयत्न; लशीबाबतचे खोटे वृत्त आरोग्य मंत्रालयाने फेटाळले

    कॅनडा पाठोपाठ ब्रिटनने शेतकरी आंदोलनात नाक खुपसले -३६ ब्रिटिश खासदारांनी ब्रिटन सरकारला लिहिले पत्र

    राहुल गांधींच्या नेतृत्वावर पवारांचा वार; यशोमती ठाकुरांचा पवारांवर पलटवार