विशेष प्रतिनिधी
कोलकाता : जयंती गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची आणि गीत ममतांचे असा प्रकार पश्चिम बंगालच्या पोलिसांनी केला आहे. रवींद्रनाथांच्या जयंती निमित्ताने आयोजित प्रत्येक सरकारी कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांचे गीत म्हणणे किंवा पोलिस बँडवर वाजविणे सक्तीचे करण्यात आले आहे. बंगालच्या पोलिस महासंचालकांनी तसे लेखी आदेशच काढले आहेत.
रवींद्रनाथांची जयंती संपूर्ण बंगालमध्ये रवींद्र संगीताने साजरी करण्यात येते. पण यंदा ती ममता गीताने साजरी करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. ममता बँनर्जी यांनी कोरोना संदेश देणारे गीत लिहिले आहे.
सोशल डिस्टंसिंगपासून उपचार करून घेण्याचे आवाहन या गीतांमध्ये करण्यात आले आहे. मात्र या ममता गीताची सक्ती करण्यास विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. रवींद्रनाथांची जयंती आणि कोरोना संदेशाचे ममता गीत या दोन भिन्न गोष्टी आहेत, असे विरोधकांनी म्हटले आहे.