लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर तणावाची स्थिती कायम आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झडप झाली होती. चिनी सैनिकांनी भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्नही सुरू केला होता. पण वेळेवर कुमक दाखल झाल्याने चिनी सैनिकांचा डाव उधळून लावण्यात भारतीय सैनिकांना यश आले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर तणावाची स्थिती कायम आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झडप झाली होती. चिनी सैनिकांनी भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्नही सुरू केला होता. पण वेळेवर कुमक दाखल झाल्याने चिनी सैनिकांचा डाव उधळून लावण्यात भारतीय सैनिकांना यश आले.
लडाख परिसरात भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यावर चीने थोडी नरमाईची भूमिका घेतली होती. दोन्ही देश चर्चा करूनच मार्ग काढतील असे चीनी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होते. मात्र, त्यानंतरही चीनच्या कुरापती सुरू आहेत.
गालवान नाला भागात प्रत्यक्ष ताबा रेषेवर चीनने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच सैनिक वाढवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी चीनचा डाव लक्षात आला होता. चिनी सैनिकांचा भारतीय सीमेच्या आत दूरपर्यंत घुसण्याचा डाव होता. भारतीय सुरक्षा दलांनी सुरुवातीला वाद टाळण्याचा प्रयत्न केला. पण नंतर जवानांची संख्या तातडीने वाढवून चीनचा डाव उढळून लावला. जवानानेच पुरेसे संख्याबळ तैनात केल्याने चिनी सैनिकांना रोखण्यात मदत झाली.
गालवान नाला भागात चिनी सैनिक भारतीय लष्कराच्या ११४ ब्रिगेडच्या जवानांच्या जवळच तंबू टाकून आहेत.
चीनकडून या भागात रस्ता बनवण्यात येत होता तेव्हा भारताने आक्षेप घेतला होता. त्यावेळी चीननेही भारताकडून गालवान भागात बांधण्यात येणाऱ्या पुलावर आक्षेप घेतला होता. आता भारताने या भागातील आपल्या ठिकाणाजवळ लष्कराच्या दोन कंपन्या तैनात केल्या आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांत भारताने डीबीओ भागात रस्ता बनवला आहे. त्यामुळे चीनचा तीळपापड होत आहे.
भारताकडून करण्यात येत असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी चिनी हेलिकॉप्टर घिरट्या घालून विरोध करण्याचा प्रयत्न करत असतात. हे हेलिकॉप्टर अतिशय जवळून उडतात. चीनने एलएसीजवळ किमान ५ हजार सैनिक तैनात केले आहेत. भारतानेही तिथे मोठ्या प्रमाणावर सैनिक तैनात केलेत, असं सूत्रांनी सांगितले.