चीनी व्हायरसशी सामना करण्यासाठी जगातील अनेक देशांनी आर्थिक पॅकेज जाहीर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तब्बल २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) १० टक्के ऐवढे हे पॅकेज असून जपान आणि अमेरिकेनंतर भारताचे पॅकेज सर्वात मोठे आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : चीनी व्हायरसशी सामना करण्यासाठी जगातील अनेक देशांनी आर्थिक पॅकेज जाहीर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तब्बल २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) १० टक्के ऐवढे हे पॅकेज असून जपान आणि अमेरिकेनंतर भारताचे पॅकेज सर्वात मोठे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्राला संबोधित करताना २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करताना आत्मनिर्भरतेचा नारा दिला आहे. आजपर्यंत जगातील अनेक देशांनी पॅकेज घोषित केले आहे. परंतु, भारताच्या पॅकेजचे वैशिष्टय म्हणजे यामध्ये समाजातील सर्व स्तरांतील लोकांचा विचार केला आहे.
जपान आणि अमेरिका या बळकट अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या तुलनेत भारताची कामगिरी मोठी आहे. जपानने आपल्या जीडीपीच्या २१ टक्के रकमेचे पॅकेज जाहीर केले आहे. जगातील सर्वात मोठी आर्थिक सत्ता असलेल्या अमेरिकेचे पॅकेज ११ टक्के आहे. आॅस्ट्रेलियाने ९.९ टक्के रकमेचे पॅकेज घोषित केले आहे. कॅनडा (८.४ टक्के), ब्राझील (६.७५टक्के), जर्मनी (४.९ टक्के), युरोपीयन यूनियन (४ टक्के), अर्जेंटिना (३.५ टक्के),सोदी अरेबया (२.८ टक्के), रशिया, इंडोनेशिया (प्रत्येकी २.६ टक्के), चीन (२.५ टक्के), तुर्कस्थान (१.५ टक्के) असे पॅकेज जाहीर केले आहे. चीनी व्हायरसचा सर्वाधिक कहर झालेल्या इटलीमध्ये जीडीपीच्या १.४ टक्के रकमेचे पॅकेज घोषित करण्यात आले आहे.
भारताच्या तुलनेत प्रगत समजल्या जाणार्या देशांनीही आपल्या जीडीपीच्या खूप कमी रकमेचे पॅकेज जाहीर केले आहे. त्याचबरोबर भारतामध्ये या पॅकेजसोबतच कल्याणकारी योजनाही राबविल्या जात आहेत. त्यामुळे संपूर्ण जगातूनच भारताच्या या पॅकेजचे स्वागत केले जात आहे.