• Download App
    चिनी विषाणू बाधितांच्या संख्येत ममतादिदींचा घोळ असल्याचा कॉंग्रेसचाही आरोप | The Focus India

    चिनी विषाणू बाधितांच्या संख्येत ममतादिदींचा घोळ असल्याचा कॉंग्रेसचाही आरोप

    भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम बंगालमधील सर्व खासदारांनी ममता बॅनर्जींवर चीनी व्हायरसग्रस्त रुग्णांचा आकडा लपवित असल्याची टीका करत आंदोलन केल्यावर आता कॉँग्रेसलाही जाग आली आहे. आता कॉँग्रेसनेही ममता बॅनर्जी चीनी व्हायरसचे रुग्ण आणि त्यामुळे झालेले मृत्यू लपवित असल्याचा आरोप केला आहे.


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम बंगालमधील सर्व खासदारांनी ममता बॅनर्जींवर चीनी व्हायरसग्रस्त रुग्णांचा आकडा लपवित असल्याची टीका करत आंदोलन केल्यावर आता कॉँग्रेसलाही जाग आली आहे. आता कॉँग्रेसनेही ममता बॅनर्जी चीनी व्हायरसचे रुग्ण आणि त्यामुळे झालेले मृत्यू लपवित असल्याचा आरोप केला आहे.

    ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये चीनी व्हायरसविरुध्द लढाई लढण्यात अपयशी ठरल्या आहेत, यावर त्यांच्या सर्व विरोधकांचे एकमत आहे. आजाराविरुध्द लढण्याऐवजी ममता आत्मघातकीपणे आकडा लपवित आहे. त्यामुळे येथे मोठा भडका उडून संपूर्ण राज्य चीनी व्हायरसच्या विळख्यात सापडण्याची भीती आहे. भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनीही याबाबत आंदोलन केले होते. केंद्रीय गृह मंत्रालयानेही बंगाल सरकारला खरमरीत पत्र लिहिले होते. हे सगळे झाल्यावर आता कॉँग्रेसही जागी झाली आहे.

    बुधवारी लोकसभेत विरोधीपक्ष नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, राज्य सरकार चीनी व्हायरसची प्रकरणे आणि मृत्यू लपवत आहे.

    मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांना सांगण्यात आले आहे की, चीनी व्हायरसने मृत्यू झाला आहे, असे कोणालाही सांगू नये.
    पश्चिम बंगाल सरकार अगदी सुरूवातीपासून चीनी व्हायरसविरुध्द लढण्याऐवजी खोटी आकडेवारी देण्यावर आणि केंद्राशी वाद घालण्यावरच भर देत आहे. येथील लोकसंख्येची घनता खूप जास्त आहे. त्यातच मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे.

    अनेक भागात रमजानच्या महिन्यात सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. त्यामुळे केंद्रालाही भीती वाटत आहे की पश्चिम बंगालमध्ये अचानक मोठा भडका उडून चीनी व्हायरसचा उद्रेक हाताबाहेर जाईल. मात्र, ममता बॅनर्जी सातत्याने सगळे आरोप फेटाळत आहेत.

    Related posts

    एनडीटीव्हीच्या फेक न्यूजने कोट्यवधींच्या आशेला ग्रहण लावण्याचा प्रयत्न; लशीबाबतचे खोटे वृत्त आरोग्य मंत्रालयाने फेटाळले

    कॅनडा पाठोपाठ ब्रिटनने शेतकरी आंदोलनात नाक खुपसले -३६ ब्रिटिश खासदारांनी ब्रिटन सरकारला लिहिले पत्र

    राहुल गांधींच्या नेतृत्वावर पवारांचा वार; यशोमती ठाकुरांचा पवारांवर पलटवार