विशेष प्रतिनिधी
कोलकाता : बंगालमधील हॉस्पिटलमधील गैरव्यवस्था सुधारण्याऐवजी मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांचे सरकार नवे नवे आणि अजब फतवे काढत आहे. मोबाईल फोन कोरोना फैलावण्यास कारणीभूत ठरतो असे सांगत ममतांनी राज्यातील सर्व हॉस्पिटलमधील डॉक्टर, वैद्यकीय, आरोग्य कर्मचाऱ्यांवर मोबाईल बंदी लादली आहे.
एम. आर. बांगर हॉस्पिटलमधील बेडवर पडलेल्या मृतदेहाचे चित्रीकरण काढून तो विडिओ सोशल मीडियावर रुग्णाच्या नातेवाईकाने शेअर केला होता. हा मृतदेह प्लँस्टीक शीटने झाकला होता. त्यानंतर बंगालचे आरोग्य मंत्रालय स्वास्थ्य भवन मधून डॉक्टर, वैद्यकीय, आरोग्य कर्मचारी तसेच रुग्ण यांना कोविड १९ हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डमध्ये मोबाईल फोन नेण्यास, वापरण्यास बंदी घातली आहे.
हॉस्पिटलमधील व्यवस्थापनाकडे जमा करावे लागतील आणि काम संपवून बाहेर जाताना ते पुन्हा ताब्यात घ्यावे लागतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
बांगर हॉस्पिटलमधील गैरव्यवस्थेवर देखील स्वास्थ्य भवनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक पांघरूण घालण्याचा प्रकार केला आहे. हॉस्पिटलमधील बेडवर एखादवेळी मृतदेह पडून राहू शकतो. मृतदेहाची पुढची व्यवस्था करण्यास वेळ लागतो, असे अजब समर्थन अधिकाऱ्यांनी केले आहे.