भारताने पाकिस्तानच्या ताब्यातील गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये निवडणुका होणार असल्याच्या आदेशाचा कडक शब्दात विरोध केला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की, जम्मू-काश्मीर आणि लडाखशिवाय गिलगिट-बाल्टिस्तानदेखील भारताचा अविभाज्य घटक आहे.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानच्या ताब्यातील गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये निवडणुका होणार असल्याच्या आदेशाचा कडक शब्दात विरोध केला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की, जम्मू-काश्मीर आणि लडाखशिवाय गिलगिट-बाल्टिस्तानदेखील भारताचा अविभाज्य घटक आहे.
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने सरकारला गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये निवडणुका करणे आणि यासंबंधि केंद्रीय कायद्यात संशोधन करण्याचे आदेश दिले आहेत. यावरून भारताने पाकिस्तानला कडक शब्दांत ताकीद दिली आहे.
गिलगिट-बाल्टिस्तान भारताचा अविभाज्य घटक आहे, त्यामुळे पाकिस्तानने या क्षेत्राला तात्काळ रिकामे करावे. या भागात त्यांचा कब्जा हा चुकीचा आहे. आम्ही पाकिस्तानच्या एका वरिष्ठ राजनैतिक मुत्सद्याकडे आमची बाजू मांडली आहे, असे भारताने म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले की, आम्ही पाकिस्तानला स्पष्टपणे सांगितले आहे की, जम्मू-काश्मीर, लद्दाख आणि गिलगित-बाल्टिस्तान कायद्यानुसार भारताचा भाग आहेत. कब्जा केलेल्या या भागांवर पाकिस्तानी सरकार कोणत्याच निवडणुका घेऊ शकत नाही. भारत या गोष्टीला कधीच सहन करणार नाही.