विशेष प्रतिनिधी
मालेगाव : येथील संगमेश्वर भागातील अल्लमा इकबाल पुलावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर आज सकाळी काही समाज कंटकानी हल्ला केला. यामुळे या परीसरात घबराटीचे वातावरण पसरले होते.
मालेगाव शहरातील संगमेश्वर भागातील अल्लमा एकबाल पुलावर बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. चंदनपुरी गेट ते मोतीबाग नाका परिसराला जोडणाऱ्या या पुलावर मोठी वर्दळ असते. मात्र करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील पूर्व व पश्चिम भागाला जोडणारे सर्व पुल बंद करण्यात आले आहे.
यात सदर पुल देखील रहदारीस बंद करण्यात आला आहे. आज गुरूवार दि.२३ रोजी सकाळी अचानक येथील काही समाजकंटकानी बंदोबस्तावर तैनात पोलिस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करीत हल्ला केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता