• Download App
    कोरोना हॉटस्पॉट मालेगावमध्ये पोलिसांवर दगडफेक | The Focus India

    कोरोना हॉटस्पॉट मालेगावमध्ये पोलिसांवर दगडफेक

    विशेष  प्रतिनिधी

    मालेगाव : येथील संगमेश्वर भागातील अल्लमा इकबाल पुलावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर आज सकाळी काही समाज कंटकानी हल्ला केला. यामुळे या परीसरात घबराटीचे वातावरण पसरले होते.

    मालेगाव शहरातील संगमेश्वर भागातील अल्लमा एकबाल पुलावर बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. चंदनपुरी गेट ते मोतीबाग नाका परिसराला जोडणाऱ्या या पुलावर मोठी वर्दळ असते. मात्र करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील पूर्व व पश्चिम भागाला जोडणारे सर्व पुल बंद करण्यात आले आहे.

    यात सदर पुल देखील रहदारीस बंद करण्यात आला आहे. आज गुरूवार दि.२३ रोजी सकाळी अचानक येथील काही समाजकंटकानी बंदोबस्तावर तैनात पोलिस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करीत हल्ला केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता

    Related posts

    एनडीटीव्हीच्या फेक न्यूजने कोट्यवधींच्या आशेला ग्रहण लावण्याचा प्रयत्न; लशीबाबतचे खोटे वृत्त आरोग्य मंत्रालयाने फेटाळले

    कॅनडा पाठोपाठ ब्रिटनने शेतकरी आंदोलनात नाक खुपसले -३६ ब्रिटिश खासदारांनी ब्रिटन सरकारला लिहिले पत्र

    राहुल गांधींच्या नेतृत्वावर पवारांचा वार; यशोमती ठाकुरांचा पवारांवर पलटवार