चीनी व्हायरस संकटाचा धैैर्याने सामना केल्याबद्दल संपूर्ण जगातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक होत आहे. मात्र, कॉंग्रेसचे राजकारण सुरू आहे. मोदी म्हणजे आजपर्यंतचे सर्वात कमकुवत पंतप्रधान, अशी संभावना कॉंग्रेसने केली आहे. यावर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी संताप व्यक्त केला.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनी व्हायरस संकटाचा धैैर्याने सामना केल्याबद्दल संपूर्ण जगातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक होत आहे. मात्र, कॉंग्रेसचे राजकारण सुरू आहे. आजपर्यंतचे सर्वात कमकुवत पंतप्रधान अशी टीका करत आहे. त्यामुळे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी संताप व्यक्त केला.
मोदी यांनी लॉकडाउन जाहीर केला आणि त्याचा कालावधीही वाढविला. त्यामुळे भारतातील नागरिकांचे हाल झाले, असे म्हणत छत्तीसगड कॉंग्रेस समितीने टीका केली आहे. आजवरचे सर्वात कमकूवत पंतप्रधान असे म्हटले आहे. त्यावर खेर ट्विटरवर म्हणाले की, खोटं बोलू नका, हा विनोद तर एक एप्रिलला देखील चालणार नाही. कॉंग्रेसला त्यांनी खोटे बोलणार्यांचा पक्षही म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कॉंग्रेस सातत्याने टीका करत आहे. त्यामुळे खेर यांनी कॉंग्रेसला चांगलेच फटकारले आहे. शेकडो जणांनी अनुपम खेर यांना पाठिंबा दिला आहे. मोदींवर टीका करण्यापूर्वी कॉँग्रेसने आपल्या दहा वर्षांच्या काळात काय केले ते पाहावे, असा सल्ला देण्यात आला आहे. काहींनी तर आताच्या संकटाच्या काळात कॉंग्रेसचे सरकार असते तर देशाचे वाटोळे झाले असते अशी भीती व्यक्त केली आहे.
चल….. झूठे कहीं के!! ये जोक तो 1st April वाले दिन भी फ़िट नहीं बैठता।???? https://t.co/mD5GE9EnCH
— Anupam Kher (@AnupamPKher) May 19, 2020