कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसच्या सरकारने मंत्रालयाला दलालांचा अड्डा बनविले होते. लूटमार हेच त्यांचे काम होते. १५ महिन्यांत हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्या या सरकारला खाली खेचून ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मूर्तीमंत त्यागाचे उदाहरण दिले असल्याचे प्रतिपादन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले.
विशेष प्रतिनिधी
भोपाळ : कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसच्या सरकारने मंत्रालयाला दलालांचा अड्डा बनविले होते. लूटमार हेच त्यांचे काम होते. १५ महिन्यांत हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्या या सरकारला खाली खेचून ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मूर्तीमंत त्यागाचे उदाहरण दिले आहे, असे मत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केले.
कॉंग्रेसमधून राजीनामा देऊन बाहेर पडलेल्या कॉंग्रेसच्या आमदारांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. या वेळी चौहान बोलत होते. या वेळी बोलताना चौहान हणाले, कमलनाथ सरकारने गोरगरीबांच्या हक्कावर दरोडा टाकण्याचे काम केले आहे. त्यांना रोखणे गरजेचे होते. हे धैर्य ज्योतिरादित्य शिंदे यांनी दाखविले. सत्याच्या बाजुने ते उभे राहिले. यातून मूर्तीमंत त्यागाचे उदाहरण त्यांनी घालून दिले आहे. त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी आपले मंत्रीपद आणि आमदारकी पणाला लावली आहे.
मध्य प्रदेशात मतांची टक्केवारी भारतीय जनता पक्षापेक्षा कमी असूनही काही जागा जास्त मिळविल्याने कॉंग्रेसने सरकार स्थापन केले होते.
मात्र, तेव्हापासूनच कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यामध्ये वाद सुरू झाला होता. याच काळात कमलनाथ यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघड होऊ लागली होती. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे अस्वस्थ होते. याबाबत त्यांनी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी आणि हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे तक्रारीही केल्या होत्या. मात्र, त्यांनी याकडे दूर्लक्ष केले. त्यामुळे शेवटी कंटाळून ज्योतिरादित्य शिंदे यांनी कॉंग्रेसचा त्याग केला आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.