• Download App
    केजरीवालांची चाल; जनतेच्या सूचनांच्या नावाखाली लॉकडाऊन निर्णयाचे ओझे केंद्रावर | The Focus India

    केजरीवालांची चाल; जनतेच्या सूचनांच्या नावाखाली लॉकडाऊन निर्णयाचे ओझे केंद्रावर

    दिल्लीतील चीन व्हायरसला रोखण्यात ‘व्यवस्थापन गुरू’ म्हणविले जाणारे अरविंद केजरीवाल भलेही अपयशी ठरले. मात्र, केंद्राला अडचणीत आणण्यासाठी त्यांच्या नवनवीन चाली सुरूच आहेत. लॉकडाऊनमध्ये सुट देण्यासंदर्भात त्यांनी जनतेकडून सूचना मागविल्या होत्या. मात्र, याबाबत निर्णयाचे ओझे त्यांनी केंद्र सरकारवर सोपविली आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीतील चीन व्हायरसला रोखण्यात ‘व्यवस्थापन गुरू’ म्हणविले जाणारे अरविंद केजरीवाल भलेही अपयशी ठरले आहेत. मात्र, केंद्राला अडचणीत आणण्यासाठी त्यांच्या नवनवीन चाली सुरूच आहेत. लॉकडाऊनमध्ये सुट देण्यासंदर्भात त्यांनी जनतेकडून सूचना मागविल्या होत्या. मात्र, याबाबत निर्णयाचे ओझे त्यांनी केंद्र सरकारवर सोपविली आहे.

    लॉकडाऊनचा निर्णय हा दुधारी तलवारीसारखा आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतर रुग्णसंख्या वाढल्यास सरकारला प्रश्न विचारले जाऊ शकतात. निर्बंध कायम राहिल्यास आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. त्यामुळेच केजरीवाल यांनी दोन दिवसांपूर्वी जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. याबद्दल जवळपास पाच लाख सूचना मिळाल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी जनतेचे आभार मानले आहेत. यातील काही सूचना आपण केंद्राकडे पाठवणार असल्याचंही केजरीवाल यांनी म्हटलंय.

    एसी रुममध्ये बसून आम्ही याचा निर्णय घेणार नाही, असं आम्ही ठरवलं होतं. त्यानुसार आम्ही लोकांकडून सूचना मागवल्या. त्याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. लोकांच्या म्हणण्यानुसार मेट्रो आणि सार्वजनिक वाहतुकीची साधनं नियंत्रित प्रवासी संख्येसहीत सुरू करायला हवीत तसंच रेड झोनमध्ये मात्र कोणतीही परवानगी दिली जाऊ नये, असंही यावेळी अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

    अनेक जणांनी शाळा महाविद्यालय आत्ताच सुरू करू नयेत अशाही सूचना केल्या आहेत.आम्ही या सूचनांवर चर्चा करून केंद्राला प्रस्ताव पाठवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

    Related posts

    एनडीटीव्हीच्या फेक न्यूजने कोट्यवधींच्या आशेला ग्रहण लावण्याचा प्रयत्न; लशीबाबतचे खोटे वृत्त आरोग्य मंत्रालयाने फेटाळले

    कॅनडा पाठोपाठ ब्रिटनने शेतकरी आंदोलनात नाक खुपसले -३६ ब्रिटिश खासदारांनी ब्रिटन सरकारला लिहिले पत्र

    राहुल गांधींच्या नेतृत्वावर पवारांचा वार; यशोमती ठाकुरांचा पवारांवर पलटवार