• Download App
    केंद्राच्या रेड झोन सूचनेवरही ममतांचा थयथयाट | The Focus India

    केंद्राच्या रेड झोन सूचनेवरही ममतांचा थयथयाट

    केंद्राच्या प्रत्येक गोष्टीवर थयथयाट करण्याची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सवय चीनी व्हायरसच्या संकटातही गेलेली नाही. केंद्र सरकारने संपूर्ण देशातील जिल्हावार रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनची यादी तयार केली आहे. मात्र, ही यादी मानण्यास ममतांनी नकार दिला आहे.


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्राच्या प्रत्येक गोष्टीवर थयथयाट करण्याची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सवय चीनी व्हायरसच्या संकटातही गेलेली नाही. केंद्र सरकारने संपूर्ण देशातील जिल्हावार रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनची यादी तयार केली आहे. मात्र, ही यादी मानण्यास ममतांनी नकार दिला आहे.

    केंद्र सरकारने शुक्रवारी देशातील चीनी व्हायरसच्या उद्रेकानुसार रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन घोषित केले आहेत. यासाठी विविध संस्थांनी अभ्यासही केला गेला. यामध्ये पश्चिम बंगालमधील १० जिल्ह्यांचा समावेश आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांच्या सरकारने आपल्या राज्यात १० रेड झोन नसून चारच आहेत, असे म्हटले आहे. केंद्राला तसे पत्रही पाठविले आहे.

    रेड झोनला ऑरेंज म्हणून जर या ठिकाणी व्यवहार सुरू झाले तर चीनी व्हायरसचा मोठा उद्रेक होऊ शकतो. परंतु, ममता आपल्या राजकारणापुढे या धोक्याकडे बघायला तयार नाही.

    ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये चीनी व्हायरसविरुध्द लढाई लढण्यात अपयशी ठरल्या आहेत, यावर त्यांच्या सर्व विरोधकांचे एकमत आहे. आजाराविरुध्द लढण्याऐवजी ममता आत्मघातकीपणे आकडा लपवित आहे. त्यामुळे येथे मोठा भडका उडून संपूर्ण राज्य चीनी व्हायरसच्या विळख्यात सापडण्याची भीती आहे.

    भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनीही याबाबत आंदोलन केले होते. केंद्रीय गृह मंत्रालयानेही बंगाल सरकारला खरमरीत पत्र लिहिले होते.

    कॉंग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनीही पश्चिम बंगाल सरकार चीनी व्हायरसची प्रकरणे आणि मृत्यू लपवत आहे, असा आरोप केला होता.

    Related posts

    एनडीटीव्हीच्या फेक न्यूजने कोट्यवधींच्या आशेला ग्रहण लावण्याचा प्रयत्न; लशीबाबतचे खोटे वृत्त आरोग्य मंत्रालयाने फेटाळले

    कॅनडा पाठोपाठ ब्रिटनने शेतकरी आंदोलनात नाक खुपसले -३६ ब्रिटिश खासदारांनी ब्रिटन सरकारला लिहिले पत्र

    राहुल गांधींच्या नेतृत्वावर पवारांचा वार; यशोमती ठाकुरांचा पवारांवर पलटवार