पुण्यातील मध्य वस्तीतील पेठांचा भाग आणि झोपडपट्यांत चीनी व्हायरसचा उद्रेक पसरला होता. मात्र, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालक मंत्री अजित पवार बैठकांमध्ये लोकांनाच इशारे देण्यात व्यस्त होते. मात्र, केंद्राच्या फटकाऱ्यानंतर दाट लोकवस्तीतील नागरिकांचे संस्थात्मक क्वारंटाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील मध्य वस्तीतील पेठांचा भाग आणि झोपडपट्यांत चीनी व्हायरसचा उद्रेक पसरला होता. मात्र, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालक मंत्री अजित पवार बैठकांमध्ये लोकांनाच इशारे देण्यात व्यस्त होते. मात्र, केंद्राच्या फटकाऱ्यानंतर दाट लोकवस्तीतील नागरिकांचे संस्थात्मक क्वारंटाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुण्यातील मध्य वस्तीतील सुमारे साडेतीन लाख लोकांना शाळा, मंगल कार्यालये आणि खासगी वसतीगृहात हलविण्याचा निर्णय घेण्यात आल आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, अजित पवारांनी हा निर्णय केंद्राने फटकारल्यानंतर घेतल्याची माहिती पुढे आली आहे.
केंद्रीय पातळीवर चीनी व्हायरसची माहिती देण्यासाठी घेतल्या जाणाºया पत्रकार परिषदेत सोमवारी पुण्याचा विशेष उल्लेख झाला. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या पुण्या सलीला यांनी पुण्यातील स्थितीचे वाभाडेच देशासमोर काढले. आंतर मंत्रालयीन केंद्रीय टीमने पिंपरी-चिंचवड, हरणवाडी आणि बारामती प्रतिबंधित क्षेत्रांना भेटी दिल्या त्याचबरोबर त्यांनी स्थलांतरित मजुरांची निवारा क्षेत्रे,
भाजी मंडई, रेशन दुकाने, जिल्हा परिषद कंट्रोल रूम, नगर निगम वॉर्डरूम आणि हॉस्पिटल्सना देखील भेटी दिल्या. त्यांच्या असे लक्षात आले की रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग पुण्यात सात दिवस आहे, उर्वरित देशापेक्षा जलद आहे.
देशात दर 23 नमुन्यांमध्ये 1 जण पॉझिटिव्ह आढळत असताना पुण्यामध्ये दर नऊ नमुन्यांमध्ये एक जण पॉझिटिव्ह आढळतो आहे.
केंद्रीय टीमने सूचना केली की ज्यांना जास्त धोका आहे अशा लोकांना ओळखले जावे आणि चाचण्या तसेच निरीक्षण वाढविण्यात यावे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा वेगही वाढविण्यात यावा. झोपडपट्टी, बाजार याठिकाणी वावराचे नियम घालून दिले जावेत.
बरेच डॉक्टर, पॅरामेडिकल, पोलीस आणि आपत्कालीन सेवा कर्मचारी हे पॉझिटिव्ह आढळले आहेत ही चिंतेची बाब आहे कारण हे लोक दररोज खूप लोकांच्या संपर्कात येत असतात. केंद्रीय टीमने लॉकडाऊनच्या नियमांचे कठोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. या टीमने झोपडपट्टी भागासाठी संस्थात्मक विलगीकरणावर भर दिला जावा, असे सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून धडाकेबाज निर्णय घेणारे असे म्हणविले जाणारे अजित पवार केवळ पुणेकरांनाच इशारा देत होते. लॉकडाऊन कठोर करा, असे सांगत होते. मात्र, शासनाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना होत नव्हती. शेवटी केंद्रीय गृह मंत्रालयाकडूनच फटकारल्यानंतर पुण्यातील साडेतीन लाख नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.