• Download App
    कुस्तीपटू बबिता फोगटने ठाकरे सरकारला 'आपटले' | The Focus India

    कुस्तीपटू बबिता फोगटने ठाकरे सरकारला ‘आपटले’

    पालघर येथील मॉब लिंचिंगच्या घटनेने महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेलाच तडा गेला आहे. महाराष्ट्रातील पालघर येथे पोलिसांसमोर तीन संतांची हत्या करण्यात आली. ठाकरे सरकार झोपा काढतंय का? त्यांना लाज वाटली पाहिले. सर्व दोषी कॅमेरामध्ये स्पष्टपणे दिसत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई केली गेली पाहिजे, अशी मागणी कुस्तीपटू बबिता फोगट हिने केली आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पालघर येथील मॉब लिंचिंगच्या घटनेने महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेलाच जणू तडा गेला आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात पोलिसांसमोर तीन संतांची हत्या करण्यात आली. ठाकरे सरकार झोपा काढतंय का? त्यांना लाज वाटली पाहिले. सर्व दोषी कॅमेरामध्ये स्पष्टपणे दिसत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई केली गेली पाहिजे, अशी मागणी कुस्तीपटू बबिता फोगट हिने केली आहे.

    पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या गडचिंचले येथे जमावाकडून तीन साधूंची जमावानं हत्या केली होती. गुरुवारी रात्री डहाणू तालुक्यातील गडचिंचले परिसरात दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाला गावकर्यांनी अमानुषपणे मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात चोर फिरत असल्याच्या अफवा पसरली होती. त्यातून ही घटना घडल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे.

    माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी तर पालघरमध्ये या महान संतांच्या हत्येमध्ये ठाकरे सरकार जळून खाक होईल, अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे.  लया घटनेला मी कधीही विसरणार नाही. महाराष्ट्रत संतांची जी निर्घृण हत्या झाली त्यामध्ये एक ७० वर्षांचेही संत होते. ही घटना भयानक असून अंतरात्म्याला खूप मोठे दु:ख झाले आहे. व्हिडीओमध्ये गुन्हेगार स्पष्ट दिसत आहेत. पोलिसही आहेत तरीही हे महापाप झाले, जिथे उद्धव ठाकरेंचे सरकार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

    पालघरमधील मॉब लिंचिंग घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील दोषींना कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय समाजकल्याण राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केली. जमावाने दोन साधूंची आणि गाडीच्या चालकाची निर्घृणपणे हत्या केली. या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे आठवले म्हटले आहे.

    या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. तो पाहून भारतीयांची मान शरमेने खाली गेली आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सोशल मीडियावर तरुणांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्रातील पोलीसांना लाज वाटली पाहिजे, असे म्हटले जात होते.

    Related posts

    एनडीटीव्हीच्या फेक न्यूजने कोट्यवधींच्या आशेला ग्रहण लावण्याचा प्रयत्न; लशीबाबतचे खोटे वृत्त आरोग्य मंत्रालयाने फेटाळले

    कॅनडा पाठोपाठ ब्रिटनने शेतकरी आंदोलनात नाक खुपसले -३६ ब्रिटिश खासदारांनी ब्रिटन सरकारला लिहिले पत्र

    राहुल गांधींच्या नेतृत्वावर पवारांचा वार; यशोमती ठाकुरांचा पवारांवर पलटवार