लंडनमध्ये रमजान ईदच्य दिवशीच एका पाकिस्तान्याने गुरुद्वाऱ्याची तोडफोड करत शिख समाजाला धमकावले आहे. काश्मिरी मुसलमानांना मदत करा अन्यथा संकटात सापडाल, असे पत्रक त्याने त्याने गुरुद्वाऱ्यावर चिकटवले आहे.
विशेष प्रतिनिधी
लंडन : लंडनमध्ये रमजान ईदच्य दिवशीच एका पाकिस्तान्याने गुरुद्वाऱ्यावर हल्ला केला. तोडफोड करत त्याने शिख समाजाला धमकावले आहे. काश्मिरी मुसलमानांना मदत करा अन्यथा संकटात सापडाल, या आशयाचे पत्रक त्याने गुरुद्वाऱ्यावर चिकटविले.
डर्बी येथील गुरू अर्जून देव गुरुद्वाऱ्याची तोडफोड करत एका पाकिस्तान्याने लाखो रुपयांचे नुकसान केले. त्याने गुरुद्वाऱ्याच्या भिंतीवर एक पत्रक चिकटवून त्याने धमकी दिली आहे. पोलीसांनी त्याला अटक केली आहे.
गुरुद्वाराच्या व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. शिख समाजाला भडकविण्याचा हा प्रयत्न असल्याचे गुरुद्वाऱ्याच्या व्यवस्थापकांनी सांगितले. मात्र, यातून आम्ही आमची सेवा बंद करणार नाही.
लंडनमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांवर हल्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी भारताचा ७३ वा स्वतंत्रता दिवस साजरा करण्यासाठी आलेल्या भारतीयांवर अंडी फेकण्यात आली होती. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी आणि पाकिस्तानी धर्मांध भारतीयांना लक्ष्य करत असल्याचे प्रकार अमेरिका आणि कॅनडातही घडत आहेत.