कर्नाटक सरकारने चीनी व्हायरसच्या संकटावर सुयोग्य पध्दतीने नियंत्रण मिळविले आहे. येथील नव्या रुग्णांची संख्या घटत आहे. बंगळुरूसारख्या शहरातही रुग्ण कमी झाले आहेत. त्यामुळेच आता कर्नाटकने महाराष्ट्रासह पाच राज्यांतील नागरिकांना आपल्या राज्यात घेताना काटेकोर तपासणी आणि चौकशी चालू केली आहे.
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : कर्नाटक सरकारने चीनी व्हायरसच्या संकटावर सुयोग्य पध्दतीने नियंत्रण मिळविले आहे. येथील नव्या रुग्णांची संख्या घटत आहे. बंगळुरूसारख्या शहरातही रुग्ण कमी झाले आहेत. त्यामुळेच आता कर्नाटकने महाराष्ट्रासह पाच राज्यांतील नागरिकांना आपल्या राज्यात घेताना काटेकोर चौकशी करण्यास आणि निकष पाळण्यास सुरुवात केली आहे.
कर्नाटक सरकारनं गुरूवारी मोठा निर्णय घेतला असून चीनी व्हायरसचा प्रकोप असलेल्या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांमुळे संसर्ग वाढण्याची भीती असल्यानं कर्नाटक सरकारनं महाराष्ट्रासह पाच राज्यातून होणारी विमान, रेल्वे आणि इतर वाहनातून होणारी सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक थांबवली आहे.
देशाच्या तुलनेन कर्नाटकने चीनी व्हायरसच्या संकटावर मात केली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यांतील रुग्णांची संख्या ७० हजारांवर पोहोचली असताना कर्नाटकात आतापर्यंत २ हजार २८३ रुग्ण कर्नाटकात आढळून आले आहेत. यासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडिरुप्पा यांच्या सरकारने विशेष काळजी घेतली. राज्यातील संपूर्ण यंत्रणा यासाठी कामाला लावली आहे. मात्र, आता इतर राज्यांतून येणाºया नागरिकांमुळे ही संख्या वाढू नये यासाठी त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. अगदीच अपवादाने अत्यावश्यक असेल तेव्हाच काटेकोर चौकशी करुन प्रवेश दिला जात आहे.
महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यातून रेल्वे, विमान आणि इतर वाहनातून होणारी वाहतूक रद्द केली आहे. केंद्र सरकारने विशेष श्रमिक रेल्वे गाड्या सोडल्यानंतर मर्यादित स्वरूपात रेल्वे वाहतुकही सुरू केली. विमान वाहतुकीलाही २५ मेपासून प्रारंभ झाला आहे. मात्र, यामुळे करोनाचा प्रसार होण्याची भीतीही अनेक राज्यांनी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
त्याचबरोबर कर्नाटक सरकारने एक जूनपासून राज्यातील मंदिरे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मंत्री के. श्रीनिवास पुजारी यांनी सांगितले की, मंदिर सुरू करण्यासाठी दिशानिर्देश आणि एसओपी लवकरच जारी केले जातील. लोकांना याचे पालन करावे लागेल.