टीव्ही पाहून वृत्तपत्र वाचून असे वाटते की सर्व उद्योग केवळ परराज्यातील मजुरांवरच चालत होते. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की, उद्योगांमध्ये अशा मजुरांची संख्या केवळ १० ते २० टक्के आहे. त्यामुळे उद्योग चालू होण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
विशेष प्रतिनिधी
पुणे : टीव्ही पाहून वृत्तपत्र वाचून असे वाटते की सर्व उद्योग केवळ परराज्यातील मजुरांवरच चालत होते. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की, उद्योगांमध्ये अशा मजुरांची संख्या केवळ १० ते २० टक्के आहे. त्यामुळे उद्योग चालू होण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
गडकरी यांनी देशभरातील संपादकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. ते म्हणाले, जिथे मजूर आपल्या राज्यात निघून गेले आहेत तिथे उद्योजकांना काम करायला माणसे हवी आहेत. पण काही ठिकाणी लहान व्यावसायिक, ठेकेदार यांना वेतन देण्यासाठी पैसे नसल्याने लोकांना नोकरीही गमवावी लागते आहे. त्यासाठी केंद्राकडून ईएसआयची रक्कम देण्यासारखे काही उपाय केले गेले आहेत.
पण जोपर्यंत कोविड-१९ वर लस येत नाही तोपर्यंतचा हा प्रश्न आहे. येत्या काही दिवसांत लस येईल, अशी शक्यता आहे. एकदा का लस आली तर आजचा धोका राहणार नाही आणि परिस्थिती तीन महिन्यांत पूर्वपदावर येईल. तोपर्यंतचाच हा प्रश्न आहे.
येत्या तीन महिन्यांत देशाची अर्थव्यवस्था रुळावर येईल. मे अखेरीपर्यंतच ३० टक्के गाडा रुळावर येणार आहे. चीनी व्हायरसच्या संकटावर आपण मात करत आहोत, असा आशावाद गडकरी यांनी व्यक्त केलाआहे. केंद्र सरकारच्या मोठ्या प्रकल्पांबाबत ते म्हणाले, अनेक कामे बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्त्वावर केली जात असून मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वेप्रमाणेच अन्य महत्त्वाच्या कामांना पुन्हा सुरुवात झाली आहे. पूर्वनियोजन व्यवस्थित झाले आहे.
टोलवसुलीच्या माध्यमातून पैशाचे संकलनही होण्यात अडचण दिसत नाही, त्यामुळे कोणताही महत्त्वाकांक्षी प्रकल्प अडणार नाहीत. लॉकडाऊननंतर ही कामे पुन्हा वेग घेतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.