चीनी व्हायरसच्या संकटकाळातही कॉंग्रेसच्या सरचिटणिस प्रियांका गांधींच्या डोळ्यासमोर उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकाच आहेत. त्यामुळे त्यांनी उत्तर प्रदेशात एक हजार बसने स्थलांतरीत कामगारांना पोहोचविण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील मंत्री सिध्दार्थनाथ सिंह यांनी त्यांना खरमरीत उत्तर दिले आहे. उत्तर प्रदेशात नव्हे तर कॉँग्रेसचे सरकार असलेल्या महाराष्ट्र आणि पंजाबात बस पाठवा असे म्हटले आहे.
वृत्तसंस्था
लखनऊ : चीनी व्हायरसच्या संकटकाळातही कॉंग्रेसच्या सरचिटणिस प्रियांका गांधींच्या डोळ्यासमोर उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकाच आहेत. त्यामुळे त्यांनी उत्तर प्रदेशात एक हजार बसने स्थलांतरीत कामगारांना पोहोचविण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील मंत्री सिध्दार्थनाथ सिंह यांनी त्यांना खरमरीत उत्तर दिले आहे. उत्तर प्रदेशात नव्हे तर कॉँग्रेसचे सरकार असलेल्या महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये बस पाठवा असे म्हटले आहे.
प्रियांका गांधी यांनी एक ट्विट करून उत्तर प्रदेशच्या सीमेवर आमच्या एक हजार बस उभ्या आहेत. त्या पाठविण्याची परवानगी द्या असे म्हटले आहे. यावर सिध्दार्थनाथ सिंह यांनी त्यांना वास्तवाची जाणीव करून दिली आहे. ते म्हणाले, प्रियांका गांंधी यांना समजायला हवे की, उत्तर प्रदेशातून मजुरांना दुसरीकडे जायचे नाही तर इतर राज्यांतून परत यायचे आहे. त्यामुळे प्रियांका गांधी यांच्या प्रस्तावात काही अर्थ नाही. त्यामुळे पंजाब आणि महाराष्ट्रात त्यांनी बस पाठवाव्यात.
पंजाबमधून निघालेल्या एका महिलेचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. यामध्ये पाय सुजल्याने एका चिमुकल्याला सुटकेसवर झोपवून त्याची आई हजार किलोमीटरचे अंतर तुडवित चालत होती. दरम्यान उत्तर प्रदेशच्या गृह विभागाचे मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात साडेसोळा लाख कामगार परतले आहेत. तब्बल ५२२ बसमधून सात लाखांवर कामगार परत आले.