विशेष प्रतिनिधी
सांगली : मक्केहून परत आलेल्या इस्लामपूरमधील एकाच कुटुंबातील 23 जणांना कोरोनाची लागण झाल्याचो स्पष्ट झाले आहे. दोनच दिवसांपूर्वी याच कुटुंबातील चार जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आता उर्वरित १२ जणांचीही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या सर्वांवर विलगीकरण वॉर्डांमध्ये उपचार सुरू आहेत, असे सांगली जिल्ह्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय साळूंके यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यात कोरोनासंदर्भात वैद्यकीय सर्वे चालू आहे. सुमारे ५०० कुटुंबांना होम क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्यावर प्रशासन लक्ष ठेवत आहे, असेही डॉ. साळूंके यांनी स्पष्ट केले. इस्लामपूरमध्ये प्रवेश करण्यावर तसेच तेथून बाहेर पडण्यावर बंधने घालण्यात आली आहेत.
हे कोरोना पॉझिटिव्ह २३ जण दोनशे ते अडीचशे लोकांच्या संपर्कात होते. सुरवातीला यांच्या संपर्कात ४० लोक आले नंतर १५० च्या आसपास लोक त्यांच्या संपर्कात आल्याची माहिती आहे.