• Download App
    आयुष्मान भारत योजनेचा १ कोटी गरिबांना मिळाला आधार | The Focus India

    आयुष्मान भारत योजनेचा १ कोटी गरिबांना मिळाला आधार

    • डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवकांचे अभिनंदन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेचा १ कोटी गरीबांना फायदा झाल्याचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या मोहिमेच्या अभूतपूर्व यशाबद्दल मोदी यांनी डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

    देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ लाखांच्या वर गेली असून तीन हजार हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र इतर देशांच्या तुलनेत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात भारताला यश आले आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या या लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर देशांनाही सहाय्य करत असल्याने त्यांचं कौतुक होत आहे. याच दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी हे ट्विट करून देशातील आरोग्य क्षेत्रालाही भारताच्या यशात सहभागी करवून घेतले आहे.

    आयुष्मान भारत या आरोग्य सेवा योजनेने १ कोटी लाभार्थ्यांचा आकडा ओलांडला आहे. या मोहिमेच्या यशाबद्दल मोदींनी डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य सेवा कर्मचार्‍यांचे कौतुक केले आहे. ‘दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत आयुष्मान भारतने मोठे यश संपादन केले आहे. या मोहिमेचा अनेकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ही एक कोटी इतकी झाली असून जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवेची योजना ठरली आहे’ असे ट्विट मोदींनी केले आहे.

    डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि आयुष्मान भारतशी संबंधित असलेल्या सर्वांचे कौतुक करतो. त्यांच्या प्रयत्नांमुळे ही योजना जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवा बनू शकली आहे. या उपक्रमामुळे गरीब आणि दलितांचा विश्वास जिंकला आहे. मी सर्व लाभार्थी व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन करतो. त्यांच्या आरोग्यासाठीही प्रार्थना करतो’ असेही मोदींनी म्हटले आहे.

    Related posts

    एनडीटीव्हीच्या फेक न्यूजने कोट्यवधींच्या आशेला ग्रहण लावण्याचा प्रयत्न; लशीबाबतचे खोटे वृत्त आरोग्य मंत्रालयाने फेटाळले

    कॅनडा पाठोपाठ ब्रिटनने शेतकरी आंदोलनात नाक खुपसले -३६ ब्रिटिश खासदारांनी ब्रिटन सरकारला लिहिले पत्र

    राहुल गांधींच्या नेतृत्वावर पवारांचा वार; यशोमती ठाकुरांचा पवारांवर पलटवार