वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी यांची मानसिकता जुन्या ब्रिटिश नोकरशाहीची; मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांचे टीकास्त्र
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोविड १९ चा परिणामकारक मुकाबला करताना शरीराची प्रतिकार शक्ती टिकून राहावी म्हणून केंद्रीय आयुष मंत्रालयाने आयुर्वेदिक, होमिओपाथी आणि युनानी औषधांची शिफारस केली आहे. मात्र या शिफारशी महाराष्ट्रात राज्य सरकारने लागूच केल्या नाहीत.
शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी यावर टीकास्त्र सोडले आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनीच जुन्या ब्रिटिश नोकरशाहीच्या मानसिकतेतून केंदीय आयुष मंत्रालयाच्या शिफारशी राज्यात लागू करण्याच्या सूचना दिल्या नसल्याची टीका डॉ. राऊळ यांनी केली. या महत्त्वाच्या विषयाकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी डॉ. लहाने यांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्स नेमला.
यात माझी नेमणूक झाली. या टास्क फोर्सने आयुष मंत्रालयाने केलेल्या शिफारशी आणि त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यास सांगितले पण गेल्या दोन महिन्यांमध्ये डॉ. संजय मुखर्जी यांनी त्यासंबंधी कार्यवाही केली नाही, अशी टीका डॉ. राऊळ यांनी केली.
महाराष्ट्र सरकारने नेहमी अँलोपाथीची कड घेतली. आता तर हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध हानीकारक ठरू शकते, असे म्हटले आहे. पण वैद्यकीय शिक्षण सचिव अजून बदलायला तयार नाहीत, अशी टीका डॉ. शुभा राऊळ यांनी केली.