विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : कुख्यात दहशतवादी संघटना आयएसआयचा हस्तक आणि हिज्बुल मुजाहिदीनचा स्वयंघोषित कमांडर रियाज नाईकू याला सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. त्याच्यावर सरकारने १२ लाखांचे इनाम लावले होते.
शोपिया जिल्ह्यातील अनेक दहशतवादी कारवायांच्या गुन्हयांमध्ये तो समील होता. २०१८ मध्ये लाइव्ह विडिओ बनवून एका युवकाची त्याने गोळ्या घालून हत्या केली होती.
काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवाया थंडावल्या होत्या. त्यामुळे सध्या तो हिज्बुल मुजाहिदीनचे विस्कटलेले जाळे पुन्हा मजबूत करण्याची तयारी करत होता. तो विविक्षित ठिकाणी आल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर धडक कारवाई करत त्यांनी रियाज नाईकूचा खात्मा केला.
पुलवामा जिल्ह्यातीव बेगपुरा भागात रियाज लपला होता. तेथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी त्याला कंठस्नान घातले. अनंतनागमधील चकमकीत बुऱ्हान वानी मारला गेल्या नंतर रियाज नाईकू हाच हिज्बुल मुजाहिदीनचा स्वयंघोषित कमांडर बनला होता. भारतीय लष्कराला आणि सैन्याला मदत करणाऱ्या पोलिसांवर रियाजने हल्ले केले होते. बुऱ्हान वानीनंतर हिज्बुलच्या सर्व कारवायांचे नियोजन आणि अंमलबजावणी रियाज नाईकू हाच करत होता. तो ज्या घरात लपला होता ते घरच भारतीय सैनिकांनी स्फोटकांनी उडवून दिले.