- ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास
- मेक इन इंडियाचे स्वप्न भारतवासी साकार करतील
- नाशिकमधील सटाणा गावचे शेतकरी राजेंद्र यादव यांच्या इनोवेशनचा उल्लेख
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाच्या प्रभावापासून मन की बात दूर नाही. पण आता हळू हळू सुरू होतेय. अर्थव्यवस्था सुरू होत आहे. पण तरीही काळजी घेतली आहे. भारताचे कोरोनाविरोधातले यश मोठे आहे. जगाच्या तुलनेत भारत पुढे आहे. संकल्पशक्ती बरोबरच भारतवासियांची सेवाशक्ती या कसोटीच्या वेळी दिसली. तमिळनाडूचे मदूराईत केशकर्तनालय चालवणारे सी. मोहन यांनी ५ लाख दिले. गौतमदास गरीबांच्या धान्यासाठी खर्च केले. भाई राजूने १०० कुटुंबांना भोजन दिले. बचतगटांनी मास्क बनविले. लोकांनी सेवाभावाने प्रचंड मोठे काम या कसोटीच्या काळात उभे केले.
संकटकाळात अनेकांनी इनोवेशन केले. आपापल्या ठिकाणी यातून संकटाचा सामना केला. नाशिकचे सटाणा गावचे शेतकरी राजेंद्र यादव ट्रँक्टरला सँनिटायझेशन मशीन बसवले. गाव सँनिटाइज करताहेत. असे अनेकजण आपापल्या परीने प्रयत्न करताहेत.
या संकटकाळात मजूर, कामगारांना सहन करावी लागणारी पीडा शब्दांत वर्णन करता येणार नाही. पण रेल्वेसह सर्व कोरोना वॉरिअर्सने त्यांची मदत करण्याचा प्रयत्न केला. देशाच्या पूर्व भागात विकास केला तर विकासाचा समतोल साधला जाईल. तेथून इतरत्र रोजगारासाठी जाणाऱ्या मजूर कामगारांना तेथेच काम मिळेल.
#MannKiBaat May 2020. Tune in. https://t.co/cyDovLkUrm
— Narendra Modi (@narendramodi) May 31, 2020
नवे रोजगार तयार होतील. येथेच मेक इन इंडियाच्या यशाला सुरवात होईल. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया हे अभियान देशवासीयांनी आपल्या हातात घेतलेयं. त्याचे नेतृत्व करताहेत. येत्या दशकभरात आत्मनिर्भर भारताची वाटचाल दमदार होईल, असा मला विश्वास वाटतो.
योगाविषयी जगात उत्सुकता वाढते आहे. जगातले अनेक राष्ट्रप्रमुख मला याबाबत विचारतात. आयुष मंत्रालयाने सर्वांसाठी योगस्पर्धा आयोजित केली आहे. या ऑनलाइन स्पर्धेत सर्वांनी भाग घ्यावा, अशी मी विनंती करतो.
आयुषमान भारत योजनेचा लाभ १ कोटी लोकांनी घेतला आहे. यात ८०% लाभार्थी ग्रामीण भागातले आहेत. मणिपूरच्या पेल्न्सामग याला याच योजनेचा लाभ मिळाला आहे. पुडचेरीच्या अमुरथा वलीने आपल्या मुलाचे ऑपरेशन याच योजनेतून केले. आणखी लोकांना आपणही आयुषमान भारत योजनेत लाभ घेण्यास सांगा. या पुण्यकार्याचे श्रेय आपल्या प्रामाणिक करदात्याचे आहे. त्याच्या योगदानातून अशा योजना साकार होतात.
बंगाल आणि ओडिशा यांनी अफ्मान वादळाचा सामना केला. सरकारने त्यांना मदत केली. या सर्व काळात मानवी जीवन संथ झाले असले तरी पर्यावरणाचा लाभ झाल्याचे दिसले आहे. पक्षी, प्राण्यांना मोकळा श्वास घ्यायला मिळालाय. त्यांचा विहाराचा विस्तार झालाय. सोशल मीडियातून याचे चित्र दिसले.
पण कोरोनाचे संकट संपलेले नाही. आपल्याला दोन गज दूरी, तोंडावर मास्क सारख्या उपाययोजना कराव्या लागतील. इथे निष्काळजी राहून चालणार नाही.