विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सोनिया गांधींना थेट प्रश्न विचारणाऱ्या अर्णव गोस्वामीला छळून झाले आता लिबरल सरकार आणि मीडियाने सुधीर चौधरीचा नंबर लावला आहे.
झी न्यूजवर जिहादचे प्रकार उलगडून दाखविल्याबद्दल संपादक सुधीर चौधरीच्या विरोधात केरळच्या कम्युनिस्ट सरकारने अजामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे. सुधीरने झी न्यूजच्या कार्यक्रमात ११ एप्रिल रोजी जिहादचे वेगवेगळे प्रकार कोणत्या राज्यांमध्ये कसे चालतात, हे सविस्तरपणे सांगितले होते. लव्ह जिहाद, जमीन जिहाद, लोकसंख्या जिहाद, शिक्षण जिहाद, सेक्युलर जिहाद यांच्यासारखे प्रकार पुराव्यांसहित उलगडून दाखविले होते.
ज्या भागात मुस्लिमांची संख्या कमी आहे, तेथे जमीन, मालमत्ता खरेदी करून लोकसंख्या वाढवायची. जम्मूमधील हा प्रकार सुधीरने उघडकीस आणला होता. असेच केरळसह विविध राज्यांमधल्या जिहादच्या प्रकारांवर प्रकाशझोत टाकला होता. यावरून केरळमध्ये त्याच्या विरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे.
सुधीरने सोशल मीडिया अकाउंटवर अजामीनपात्र गुन्ह्याची कॉपी शेअर केली आहे. जे पत्रकार राष्ट्रवादाची बाजू उचलून धरतात त्यांना छळण्याचा हा नवा प्रकार लिबरल सेक्युलर मीडियाने शोधून काढला आहे. पण माझ्या राष्ट्रवादी पत्रकारितेला हा “पुलित्झर पुरस्कार” मिळाल्याचे मी मानतो, असे सुधीरने नमूद केले आहे.