विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पालघर सेक्युलर लिंचिंग प्रकरणात थेट सोनिया गांधींना प्रश्न विचारणाऱ्या अर्णव गोस्वामीची चौकशी करणाऱ्या टीममधला एक पोलिस कोरोना पॉझिटिव्ह निघाला. अर्णवचे वकील हरिश साळवे यांनी ही माहिती सुप्रिम कोर्टात दिली.
अर्णववर मुंबईच्या रझा अकादमीने देखील कथित स्वरूपात जातीय द्वेष पसरवण्याचा आरोप लावत खटला दाखल केला आहे. हे आरोप फेटाळण्यासाठी अर्णवने सुप्रिम कोर्टात अपील केले आहे. त्याच्या सुनावणी दरम्यान साळवे यांनी पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती दिली.
अर्णवने सोनिया गांधींना पालघर सेक्युलर लिंचिंगवरून प्रश्न विचारले होते. त्यावर २७ एप्रिलला मुंबईतील ना. म. जोशी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये अर्णवची १२ तास चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी अर्णवने ही चौकशी विडिओ कॉन्फरन्सद्वारे होऊ शकत नाही का, अशी विचारणा केली होती. मात्र पोलिसांनी त्याला नकार दिला होता.
या चौकशी करणाऱ्या टीममधील दोघांना कोरोनाची लक्षणे नंतर आढळून आली. त्यापैकी एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळला, असे साळवे यांनी न्यायालयाला सांगितले.