कॉंग्रेस नेत्यांच्या संदर्भातील खटल्यांमध्ये वकीली करणारे कॉंग्रेसचे नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी कॉंग्रेसचा हात सोडून भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, सिंघवी यांनी सोशल मीडियावरून या अफवा असल्याचे म्हटले आहे.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कॉंग्रेस नेत्यांच्या संदर्भातील खटल्यांमध्ये वकीली करणारे कॉंग्रेसचे नेतेआणि राष्ट्रीय प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी कॉंग्रेसचा हात सोडून भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, सिंघवी यांनी सोशल मीडियावरून या अफवा असल्याचे म्हटले आहे.
आपल्याबद्दलच्या या चर्चा अफवा असल्याचं म्हटलंय. हे केवळ गॉसिप आहेत, असे सिंघवी यांनी म्हटले आहे. ‘हमारी अफवाह के धुंए वहीं से उठते हैं… जहां हमारे नाम से आग लग जाती है…’ असंही त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटलंय. आणखीन एका ट्विटमध्ये ‘अफवाह थी कि मैं बीमार हूं, लोगों ने पूछ पूछ कर बीमार कर दिया’ असंही त्यांनी म्हटलंय. सिंघवी यांच्यासोबतच काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनीही सिंघवी काँग्रेसचा हात सोडण्याच्या चर्चा अफवा असल्याचं म्हटलंय.
‘अफवा पसरवणाऱ्याचा मूळ उद्देश प्रतिष्ठा धुळीत मिळवण्याची आहे,’ असंही सुरजेवाला यांनी ट्विट केलंय. पंजाब नॅशनल बॅंक घोटाळ्याप्रकरणी आरोपी नीरव मोदी यांच्याकडून गैरफायदा घेण्याचा आरोप सिंघवी यांच्यावर आहे. सिंघवी यांची पत्नी अनीता सिंघवी यांनी नीरव मोदीसोबत आर्थिक व्यवहार केले होते. तब्बल सहा कोटी रुपयांचे दागिने खरेदी करण्यासाठी अनिता यांनी 4.8 कोटी रुपये रोख दिले होते.