योगींच्या मिशन रोजगार अंतर्गत एकूण 69000 शिक्षकांच्या नेमणुका
वृत्तसंस्था
लखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केलेल्या मिशन रोजगार या कार्यक्रमांतर्गत 36 हजार 950 सहाय्यक शिक्षकांना त्यांचे नेमणूक पत्रे आज देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन सोहळ्यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहाय्यक शिक्षकांची नेमणूक पत्रे वाटली. yogi adityanath news
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रोजगाराची गंभीर समस्या निर्माण झाली होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगींनी मिशन रोजगार हा कार्यक्रम हाती घेतला. yogi adityanath news
विविध क्षेत्रातील रोजगार निर्मिती हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्यानुसार राज्यात एकूण 69000 सहाय्यक शिक्षकांच्या नेमणुकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. याआधी 31000 शिक्षकांची नेमणूक पत्रे देण्यात आली आहेत.
yogi adityanath news
आजच्या सोहळ्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 36 हजार 950 सहाय्यक शिक्षकांची नेमणूक पत्रे प्रदान केली. मिशन रोजगार या कार्यक्रमाच्या आधी राज्यात 54 हजार शिक्षक आणि सहाय्यक शिक्षकांची नेमणूक पूर्वीच करण्यात आली आहे.