• Download App
    टीआरएसच्या हिंदू वोट बँकेतच भाजपची सेंधमारी; मुस्लिमांचे मात्र एकवटून ओवैसींना मतदान | The Focus India

    टीआरएसच्या हिंदू वोट बँकेतच भाजपची सेंधमारी; मुस्लिमांचे मात्र एकवटून ओवैसींना मतदान

    • तेलंगणाच्या राजकारणातील प्रमुख पक्ष बनला ही भाजपची अचिव्हमेंट… पण
    •  टीआरएस ५७, भाजप ४८, ओवैसी ४३

    विशेष प्रतिनिधी

    हैदराबाद : महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप तेलंगणाच्या राजकारणातील प्रमुख पक्ष बनला ही भाजपसाठी मोठी राजकीय कामगिरी असली, तरी मुस्लिम समाज किती एकवटून मतदान करतो, हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. भाजपने एक प्रकारे टीआरएसच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारून हिंदू मतांचा वाटा आपल्याकडे खेचून घेतला आहे. पण जुन्या हैदराबादेत असदुद्दीन ओवैसींच्या बालेकिल्ल्याचे चिरे ढासळवू शकलेली नाही. trs hindu vote hyderabad elections

    सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत हाती आलेल्या कलानुसार मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची टीआरएस ५७, भाजप ४८ आणि ओवैसींच्या एएमआयएमने ४३ जागा मिळवल्या आहेत. याचा अर्थ प्रामुख्याने जागा टीआरएसच्या घटल्या आहेत. गेल्या महापालिकेत त्यांचे ९९ नगरसेवक होते. trs hindu vote hyderabad elections

    उलट भाजपने दिलेल्या मोठ्या आव्हानाच्या बळावर ओवैसींच्या पक्षाने अर्थात एएमआयएमने आपल्या जागा टिकवून धरल्या. वास्तविक तेथे सेंधमारी आवश्यक होती, तेवढी भाजपला मारता आलेली नाही, ही राजकीय वस्तुस्थिती आहे. याचे परिणाम दक्षिणेतील राज्यांबरोबरच बंगालसारख्या मोठी मुस्लीम लोकसंख्या असलेल्या राज्यात झाल्याशिवाय राहणार नाही. मुस्लिम समाज एकप्रकारे तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांपेक्षा थेट मुस्लिम अजेंडा घेऊन चाललेल्या ओवैसींना पसंत करत असल्याचे दिसते आहे.

    एकप्रकारे हे भाजपसाठी भविष्यातले मोठे आव्हान आहे. भाजप आत्ता दक्षिणेत प्रामुख्याने प्रादेशिक पक्षांच्या वोट बँकेत सेंधमारी करणार आहे आणि त्या सगळ्या स्वतःला मानत नसल्या तरी हिंदू पार्ट्या आहेत. तेलंगण, आंध्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूत प्रत्येक प्रादेशिक पक्षांच्या वोट बँकेत अशा प्रकारे सेंधमारी केली तर भाजपला काही यश जरूर मिळेल, पण ती सेंधमारी अंतिमतः हिंदू मतांमध्ये असेल.

    trs hindu vote hyderabad elections

    प्रश्न त्यापुढचा आहे. सेंधमारी एकवटून मतदान करणाऱ्या मुस्लिम मतांमध्ये करता आली पाहिजे. प्रादेशिक पक्ष कमकुवत करून स्वतःचा टक्का वाढविण्याच्या व्यूहरचनेतून भाजपने मुस्लिम वोट बँकेच्या एकजुटीला प्रोत्साहन देणे हे एक प्रकारे राष्ट्रीय राजकारणासाठीही घातक ठरू शकते.

    Related posts

    पनवेलच्या फार्म हाऊसवर सलमान खानला चावला साप, बिनविषारी साप असल्याने बचावला

    ठाकरे – फडणवीस आणीबाणीवरून एकमेकांना भिडले; आणीबाणी लागू करणाऱ्या पक्षातले नेते हसले

    शेतकरी आंदोलनातील हेट स्पिचनंतर योगराज सिंग यांची काश्मीर फाईल्स सिनेमातून हकालपट्टी