पुण्यामध्ये राज्य सरकारने उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष खासदार प्रीतम मुंडे यांनी केला आहे. या सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे सांगितले जात आहे. pritam munde news
विशेष प्रतिनिधी
जालना : पुण्यामध्ये राज्य सरकारने उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष खासदार प्रीतम मुंडे यांनी केला आहे. या सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे सांगितले जात आहे. pritam munde news
जालना येथे राज्य सरकारवर टीका करताना मुंडे म्हणाल्या की, राज्य शासनाने या काळात सामान्य माणसाला काहीच दिले नाही. तसेच महानगरात उभारण्यात आलेल्या सेंटरला विलंब झाला.
त्यात पुणे येथे उभारण्यात आलेल्या सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाला. या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाले. राज्यात तीन वर्षांच्या मुलीपासून वयोवृद्ध महिला सुरक्षित नाही. राज्य शासनाने या काळात सामान्य माणसाला काहीच दिले नाही. कंत्राटी आरोग्य कर्मचारी भरण्यासाठी ही केंद्राने निधी दिला. पीएम फंडातून व्हेंटीलेटर दिली. प्रत्येक बीपीएल धारकांना केंद्र सरकारने मोफत धान्य दिली. तसेच महानगरात उभारण्यात आलेल्या सेंटरला विलंब झाला.
pritam munde news
मुंडे म्हणाल्या की, अतिवृष्टीतून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. सत्तेत येण्यापूर्वी हेक्टर ५० हजारांच्या मदतीची मागणी करणारे सत्तेत आल्यानंतर हेक्टरी दहा हजार मदत जाहीर केली. ही मदत ही अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. राज्य सरकार मागील वर्षभरात सर्व बाबतीत अपयशी ठरले आहे. कोविड महामारी हाताळण्यास ही हे सरकार अपयशी ठरले आहे.