विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : करदात्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय आज जाहीर केला. ५ लाख रुपयापर्यंतचे कर परतावे ताबडतोब करदात्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. देशातील १४ लाख करदात्यांना याचा लाभ होईल.
त्याच बरोबर अर्थ मंत्रालयाने एमएसएमई आणि व्यापाऱ्यांनाही दिलासादायक निर्णय घेतला आहे. जीएसटी रकमेचा विशिष्ट परतावा सुमारे १ लाख करदात्यांना देण्यात येईल. ही रक्कम १८ हजार कोटी रुपये आहे. गरीब वर्गासाठी १ लाख ७० हजार कोटींच्या पँकेजनंतर मध्यम वर्गाला आर्थिक दिलासा देणार हा निर्णय आहे.
चीनी व्हायरस कोविड १९ चा मुकाबला करताना जनतेवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी टप्प्या टप्प्याने निर्णय घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.