दिल्लीतील निजामुद्दीन मरकझला गेलेल्या १२५ तबलिगींनी फोन बंद करून ठेवल्याने त्यांना शोधता येत नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. यावर फोन बंद करून बसलेल्या बड्या नेत्याला तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तासात शोधले होते, असा जोरदार टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. पाटील अंगुलीनिर्देश करत असलेला तो ‘दादा’ नेता कोण, याची खमंग चर्चा यामुळे राज्याच्या राजकारणात रंगली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : दिल्लीतील निजामुद्दीन मरकझला गेलेल्या १२५ तबलिगींनी फोन बंद करून ठेवल्याने त्यांना शोधता येत नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. यावर फोन बंद करून बसलेल्या बड्या नेत्याल तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तासात शोधले होते, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
राज्यात निवडणुकीच्या काळात अजित पवार अचानक गायब झाले होते. त्यावेळी हवालदिल झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेत फडणवीस यांना विनंती केली होती. पवारांच्या विनंतीवरुन फडणवीस यांनी अजित पवारांचा ठावठिकाणा शोधून काढला होता. याच संदर्भातून चंद्रकांत पाटील यांनी फोन बंद केल्यावरही शोधण्याची यंत्रणा पोलीसांकडे असल्याचे म्हटले आहे.
अनिल देशमुख यांनी दिल्लीतील मरकजच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटलांनी अजित पवार यांचा नामोल्लेख टाळून महाराष्ट्रातील खूप मोठा नेता ‘नॉट रिचेबल’ असताना देवेंद्र फडणवीसांनी एका तासात त्यांचा तपास लावल्याचा गौप्यस्फोट केला. पाटील म्हणाले, मरकजवरुन आरोप करणार्यांनी त्यांचं स्वत:चं बघावं. त्यांना मरकजमधून राज्यात आलेले 125 लोक सापडत नाही. यासाठी ते मोबाईल बंद असल्याचं कारण सांगतात. मात्र, एखाद्यानं मोबाईल बंद केला तरी त्याचा पत्ता शोधता येतो. तंत्रज्ञान प्रगत असल्यानं एखाद्याने मोबाईल बंद केला, तरी त्याचा तपास काढता येतो. महाराष्ट्रातील खूप मोठा नेता मागे फोन बंद करून बसला होता. यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंती केली. नातेवाईकांच्या विनंतीनंतर तासाभरात ते कुठल्या फ्लॅटवर आहे हे शोधून काढलं.