विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी वस्त्यांमध्ये पोचलेल्या वैद्यकीय टीम आणि पोलिसांवर दगडफेकीच्या घटना उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशात घडल्या. उत्तर प्रदेशातील रामपूर आणि मुजफ्फरपूरच्या काही वस्त्यांमधून तर एवढा नालायकपणा पुढे आला की वैद्यकीय टीमवर तेथील समूदाय थुंकत होता.
वैद्यकीय टीम स्र्किनिंगसाठी रामपूरच्या एका इलाक्यात पोहोचली होती. तेथील लोकांनी त्यांना विरोध केला. टीमवर आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या पोलिसांवर दगडफेक सुरू केली. डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय टीमवर तेथील काही महिला, मुले थुंकताना आढळले. हाच प्रकार मुजफ्फरपूरमध्ये घडला. बिहारच्या मुंगेर शहरात बिहार पोलिसांच्या टीमवर आणि डॉक्टरांवर दगडफेक करण्यात आली. यात पोलिस जखमी झाले. डॉक्टर, वैद्यकीय टीमवर हल्ले मध्य प्रदेश इंदूरमध्येही करण्यात आले. शहरातील तात पट्टी भागात हा प्रकार घडला.
इंदूरमध्ये पोलिस, डॉक्टरांवर दगडफेक करणाऱ्या सात जणांना पोलिसांनी अटक केली.
रामलला को अस्थाई मंदिर में विराजित करने पर,रद्द किया रामनवमी कार्यक्रम पर,जनता कर्फ्यू पर बड़ी-बड़ी बातें करनेवाले ‘मरकज’ पर चूप है।
— Vijaya Rahatkar (@VijayaRahatkar) April 2, 2020
स्वास्थ्यकर्मी डटे हुए हैं, मगर कुछ हैं कि उनपर पत्थर बरसा रहे हैं, थूक रहे हैं। फिर भी वे लोग चूप है।
सिलेक्टिविटी के एजेंडा की भी हद होती है.. pic.twitter.com/037nLpOBXG