देशातील लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरीबांना केंद्र सरकारने कोटी मोलाची मदत केली आहे. केंद्रातील मोदी सरकारने गरीब, शेतकरी आणि मजूरांच्या खात्यात आतापर्यंत २८ हजार २५६ कोटी इतकी रक्कम जमा केली आहे. याचा फायदा देशातील ३२ हजार कुटुंबीयांना झाला आहे.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशातील लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरीबांना केंद्र सरकारने कोटी मोलाची मदत केली आहे. केंद्रातील मोदी सरकारने गरीब, शेतकरी आणि मजूरांच्या खात्यात आतापर्यंत २८ हजार २५६ कोटी इतकी रक्कम जमा केली आहे. याचा फायदा देशातील ३२ हजार कुटुंबीयांना झाला आहे.
चीनी व्हायरसमुळे देशातील सर्व व्यवहार ठप्प आहेत. गोरगरीबांना काम नाही. लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका गरीब, शेतकरी आणि मजूरांना बसला आहे. शहरातील सर्व व्यवहार थांबवण्यात आल्यामुळे अनेकांचा रोजगार केला आहे. ज्याचे हातावर पोट आहे अशा लोकांना अन्न- धान्य मिळणे अवघड झाले होते. त्यांच्यासाठी थेट अन्नधान्य पोहोचविण्यासोबतच बॅँक खात्यात पैसेही टाकण्यात आले आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत २६ मार्च रोजी १.७ लाख कोटी पॅकेजची घोषणा केली होती. याद्वारे १९.८६ कोटी महिलांच्या बँक खात्यात पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत ९ हजार ९३० कोटी रुपय इतकी मदत करण्यात आली. एक एप्रिल २०२० पर्यंत जनधन योजनेअंतर्गत १ लाख १९ हजार ७०७ कोटी रुपये जमा करण्यात आले. तर ८ कोटी शेतकऱ्यांपैकी ८७ टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १३ हजार ८५५ कोटी रोख रक्कम देण्यात आली आहे. सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार १० एप्रिल २०२० पर्यंत २.८२ विधवा, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्या बँक खात्यात १ हजार ४०५ कोटी रुपये जमा केले आहेत. याशिवाय २.१६ कोटी मजूरांच्या खात्यात ३ हजार ०६६ कोटी इतकी आर्थिक मदत देण्यात आली आहे.