चीनी व्हायरसविरोधातल्या लढ्यात आता सर्वपक्षीय नेत्यांसह सामान्य जनतेलाही उतरवण्यासाठी पंतप्रधानांनी आवाहन केले आहे. देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गोरगरीबांचे हाल होऊ नयेत यासाठी प्रत्येकाने एका कुटुंबाची जबाबदारी घ्यावी, असे भाविनक आवाहन पंतप्रधानांनी देशवासियांना केले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनी व्हायरसविरोधात लढ्यात आता सर्वपक्षीय नेत्यांसह सामान्य जनतेलाही उतरण्यासाठी पंतप्रधानांनी आवाहन केले आहे. देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गोरगरीबांचे हाल होऊ नयेत यासाठी प्रत्येकाने एका कुटुंबाची जबाबदारी घ्यावी, असे भाविनक आवाहन पंतप्रधानांनी देशवासिायांना केले आहे.
पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, तुम्ही पाच मिनिट एका जागी उभे राहून मोदींना सन्मानित करा, अशा प्रकारची एक मोहीम सुरू केल्याचे मला सांगण्यात आले आहे. पण जर माझ्यावर प्रेम असेल तर हे करण्यापेक्षा चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव असे पर्यंत त्यांनी एका कुटुंबाची जबाबदारी घ्यावी. जर कोणी मोदींना सन्मानित करू इच्छित आहे आणि माझ्यावर इतकं प्रेम आहे तर करोना व्हायरसचा प्रादुर्भाव असेपर्यंत एका गरीब कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी. माझ्यासाठी यापेक्षा मोठा कोणताही सन्मान नसेल.
मेरे ध्यान में लाया गया है कि कुछ लोग यह मुहिम चला रहे हैं कि 5 मिनट खड़े रहकर मोदी को सम्मानित किया जाए। पहली नजर में तो यह मोदी को विवादों में घसीटने की कोई खुराफात लगती है।
— Narendra Modi (@narendramodi) April 8, 2020
देशातील गोरगरीबांना मदतीसाठी पंतप्रधानांच्या सूचनेवरून केंद्रीय अर्थ मंत्रालयाने १ कोटी ७० लाख रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. गोरगरीबांना पाच किलो गहू किंवा तांदूळ आणि एक किलो डाळ रेशनकार्डवर मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी सन्मान योजनेची रक्कम खात्यात जमा करण्यात आली आहे. उज्वला गॅस योजनेअंतर्गत तीन महिने मोफत सिलेंडर मिळणार आहे. देशातील गोरगरीबांच्या जनधन खात्यात पाचशे रुपये जमा करण्यात आले आहेत. मात्र, याशिवायही अनेक गरजा असतील. त्यासाठी पंतप्रधांनी संपूर्ण देशवासियांची ताकद गरीबांच्या पाठीशी उभी करण्यास सांगितले आहे.