सोशल मीडियावर टीका केली म्हणून एका अभियंत्याला घरात बोलावून अमानुष मारहाण करणारे महाआघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांकडून निर्लज्जपणे समर्थन सुरू झाले आहे. ‘योग्यच केलं, आम्ही सोबत आहोत’ असे त्यांना जाहीर समर्थन दिले जाऊ लागले आहे. मात्र या समर्थनातून एक प्रकारे आव्हाड यांच्या बंगल्यावर, आव्हाडांच्या समक्ष, आव्हाडांच्या अंगरक्षक आणि इतरांनी मारहाण केल्याचीच कबुली एकप्रकारे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडून दिली गेली आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : सोशल मीडियावर टीका केली म्हणून एका अभियंत्याला घरात बोलावून अमानुष मारहाण करणारे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांकडून निर्लज्जपणे समर्थन सुरू झाले आहे. ‘योग्यच केलं, आम्ही सोबत आहोत’ असे त्यांना जाहीर समर्थन दिले जाऊ लागले आहे. आता सुरूवात झाली तर होऊन जाऊ दे असे म्हणत जणू विरोधकांना मारहाणीच्या धमक्याही दिल्या जाऊ लागल्या आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या गप्पा मारत ठोकशाहीला विरोध करणारे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याच्यावर काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागले आहे.
आव्हाड यांच्या नाथ या बंगल्यावर आव्हाड यांच्या उपस्थितीत एका अभियंत्याला अमानुष मारहाण करण्यात आली. आव्हाड यांच्या अंगरक्षकांनी आणि अज्ञात व्यक्तींनी चक्कर येईपर्यंत मारल्याची तक्रार संबंधित तरुणाने केली होती. या संदर्भात राज्यात आव्हाड यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे काही नेते त्यांच्या समर्थनार्थ उतरले आहे. राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी तर फेसबुकवर ‘योग्यच केलं, आम्ही सोबत आहोत’ असे म्हणत आव्हाडांचे समर्थन केले आहे.
अहिंसेवर व प्रवचन देताना जितेंद्र आव्हाड
त्या म्हणतात, खुप दिवस सहन केली, या सडक्या मेंदुच्या विचारांची घाण . महिला म्हणून राजकारण करताना मीदेखील खुप जवळून अनुभवतेय. मी एखादी प्रतिक्रिया दिली तर त्यावर वैचारिक मत मांडावे ते मला मान्य आहे. पण असं होताना दिसत नाही, एखादी महिला स्वत:च्या कर्तृत्वाने नेतृत्व स्विकारत असेल, विचार मांडत असेल, तिची कार्यप्रणाली समृद्ध होत असेल आणि तिच्यावर टिका करण्यासारखं हातात काहीच नसेल तर तर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचा जाहिर कार्यक्रम सोशल मिडीयाच्या माध्यमातून होतो. एक व्यक्ती म्हणून आम्ही सहन करतो कारण समाजात चार दोन सडकी असणार हे गृहीत धरूनच चालतो पण त्याचा परिणाम कुटुंबांवर होत असतो. आता सुरूवात झालीच आहे तर होऊन जाऊ देत. आव्हाडसाहेब….आम्ही सोबत आहोत.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनीही आपण अहिंसावादी असल्याचे म्हणत धमकीच दिली आहे. राजकीय वैचारिक मतभेद जरूर असतात आणि आहेत, पण पातळी सोडून असभ्य भाषेत किंवा घाणेरडी टिंगल टवाळी सर्वजण सहन करू शकत नसतात. इतरांनी यातून नक्की बोध घ्यावा असे वाटते, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, आव्हाड यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काहीजण पुढे येत असले तरी शरद पवार, अजित पवार या बड्या नेत्यांनी या संदर्भात अजून मौन पाळले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या संदर्भातले मौन अजून सोडलेले नाही. रोखठोक भूमिका घेणाऱ्या ‘सामना’ही आव्हाड यांच्यासंदर्भात गप्प असल्याचे दिसून आले आहे.
एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, मंत्र्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे, ही अतिशय गंभीर घटना आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 7, 2020
मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड याना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे. @CMOMaharashtra