• Download App
    पुण्यावर कोरोनाचे गंभीर संकट ; एकाच दिवसांत 9 नवे रूग्ण; एकूण रुग्ण 60; 'कोरोना बळीं'ची संख्या 2 | The Focus India

    पुण्यावर कोरोनाचे गंभीर संकट ; एकाच दिवसांत 9 नवे रूग्ण; एकूण रुग्ण 60; ‘कोरोना बळीं’ची संख्या 2

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुण्यात कोरोना विषाणूने बाधीत झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुरूवार (दि.2) रोजी एकाच दिवशी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या 9 ने वाढली आहे. विशेष म्हणजे यात 3 वर्षांच्या एका मुलीचाही समावेश असल्याने चिंता वाढली आहे. तसेच वय वर्षे 40 च्या आतील एका महिलेचा मृत्यु झाल्याने ‘कोरोना बळीं’ची पुण्यातील संख्या दोनवर पोहोचली आहे.

    पुणे शहरात 7 आणि पिंपरी चिंचवड मध्ये 2 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. यामुळे गेल्या 24 दिवसांत पुण्यात कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या 60 वर जाऊन पोहचली आहे. दिल्लीच्या तबलीग मरकजच्या कार्यक्रमाला जाऊन आलेल्यांपैकी चौघांना कोरोना विषाणूने गाठले असल्याचे स्पष्ट झाले. ही संख्या वाढण्याची भीती आहे.

    पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे. यामध्ये गेल्या चार दिवसांत कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले. गुरूवारी दिवसभरात पुण्यात 83 कोरोना संशयित व्यक्तींना शहर आणि जिल्ह्यातील विविध रूग्णालयांत दाखल करण्यात आले. यापैकी 81 व्यक्तींचे स्वॅब एनआयव्हीला पाठविण्यात आले. यामध्ये 9 व्यक्तींचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.

    पुण्यात कोरोना बाधितांचा वाढता वेग लक्षात घेता आता जिल्हा प्रशासना समोर मोठे संकट उभे राहिले आहे. यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांना आपल्या घरांमध्येच थांबण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. प्रशासनाने अनेक खाजगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये यांच्या खाटा (बेड्स) आणिबाणीच्या काळात वापरण्यासाठी ताब्यात घेणे सुरु केले आहे.

    Related posts

    पनवेलच्या फार्म हाऊसवर सलमान खानला चावला साप, बिनविषारी साप असल्याने बचावला

    ठाकरे – फडणवीस आणीबाणीवरून एकमेकांना भिडले; आणीबाणी लागू करणाऱ्या पक्षातले नेते हसले

    शेतकरी आंदोलनातील हेट स्पिचनंतर योगराज सिंग यांची काश्मीर फाईल्स सिनेमातून हकालपट्टी