• Download App
    पंतप्रधानांचे नुसते नमन नाही; वैद्यकीय कर्मचार्‍यांना मिळणार संरक्षक कवच | The Focus India

    पंतप्रधानांचे नुसते नमन नाही; वैद्यकीय कर्मचार्‍यांना मिळणार संरक्षक कवच

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ मार्च रोजी वैद्यकीय कर्मचार्‍यांना टाळ्या आणि थाळ्या वाजवून केवळ नमन केले नाही तर त्यांच्यासाठी संरक्षक कवचाचीही तयारी केली आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ मार्च रोजी वैद्यकीय कर्मचार्‍यांना टाळ्या आणि थाळ्या वाजवून केवळ नमन केले नाही तर त्यांच्यासाठी संरक्षक कवचाचीही तयारी केली आहे.

    पंतप्रधानांनी संपूर्ण जगातून वैद्यकीय कर्मचार्‍यांसाठी वैयक्तिक संरक्षण साधना संच (पीपीई) मागविण्याचे आदेश दिले. परदेशातून मागविलेले पीपीई भारतात यायला सुरवात झाली आहे.

    चीनने देणगी म्हणून दिलेली 1.70 लाख पीपीई भारतात आली आहेत. यासाठी पंतप्रधानांनी चीनच्या वरिष्ठ नेत्यांशी स्वत: चर्चा केली. देशातल्या 20, 000 पीपीई सह एकूण 1.90 लाख पीपीई आता रुग्णालयांना वितरीत करण्यात येणार आहेत. देशात सध्या उपलब्ध असलेल्या 3,87,473 पीपीईमधे याची भर पडणार आहे. केंद्र सरकारने 2.94 लाख पीपीई आतापर्यंत पुरवली आहेत.

    याशिवाय, देशात निर्मिती करण्यात आलेले 2 लाख एन 95 मास्क, विविध रुग्णालयांना पाठवण्यात येत आहेत. यासह केंद्र सरकारने आतापर्यंत 20 लाखाहून अधिक एन 95 मास्क पुरवले आहेत. नव्याने आलेल्या साहित्यापैकी, जास्त साहित्य, तामिळनाडू, महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि राजस्थान या मोठ्या संख्येने बाधित असलेल्या राज्यांना पाठवण्यात येत आहे. एम्स, सफदरजंग, आरएमएल रुग्णालय, आरआयएमएस, बीएचयु, एएमयु यांनाही साधनांचा पुरवठा करण्यात येत आहे.

    कोविड-19 वर मात करण्यासाठीच्या प्रयत्नात,पीपीईचा परदेशातून पुरवठा सुरु होणे हा महत्वाचा टप्पा आहे. एन 95 मास्क सह, 80 लाख पूर्ण पीपीई संचांची ऑर्डर सिंगापूरच्या आस्थापनाकडे आधीच नोंदवण्यात आली आहे. हा पुरवठा, येत्या 11 एप्रिल पासून सुरु होईल, असे सूचित करण्यात आले आहे, येत्या 11 तारखेला 2 लाख तर त्यानंतरच्या आठवड्यात आणखी 8 लाख पीपीई मिळण्याची अपेक्षा आहे.

    60 लाख संपूर्ण पीपीई संचाची ऑर्डर देण्यासंदर्भात चीन मधल्या कंपनीशी बोलणी अंतिम टप्प्यात आहेत. एन 95 मास्क आणि संरक्षक गॉगल यासाठी विदेशी कंपन्यांकडे स्वतंत्र ऑर्डर नोंदवण्यात आली आहे. देशाअंतर्गत क्षमतेला जोड देण्यासाठी, उत्तर रेल्वेने पीपीई विकसित केले आहे. ही पीपीई, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने याआधी विकसित केलेल्या व्यतिरिक्त आहेत.याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

    सध्याच्या एन 95 मास्क उत्पादकानी आपली क्षमता वाढवून 80,000 मास्क प्रतीदिन केली आहे. दर आठवड्याला सुमारे 10 लाख पीपीई संचाचा पुरवठा प्राप्त करणे हे उद्दिष्ट असून देशातल्या रुग्णांची संख्या पाहता सध्या पुरेशी संख्या उपलब्ध आहे. या आठवड्यात आणखी पुरवठा अपेक्षित आहे.

    Related posts

    पनवेलच्या फार्म हाऊसवर सलमान खानला चावला साप, बिनविषारी साप असल्याने बचावला

    ठाकरे – फडणवीस आणीबाणीवरून एकमेकांना भिडले; आणीबाणी लागू करणाऱ्या पक्षातले नेते हसले

    शेतकरी आंदोलनातील हेट स्पिचनंतर योगराज सिंग यांची काश्मीर फाईल्स सिनेमातून हकालपट्टी