• Download App
    दिलासादायक बातम्यांना प्रसिध्दी द्या, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला | The Focus India

    दिलासादायक बातम्यांना प्रसिध्दी द्या, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

    चीनी व्हायरसच्या प्रादुर्भावातून ठणठणीत बरे झालेल्यांचा आकडा मोठा आहे. त्याला देखील योग्य प्रसिद्धी दिली गेली, तर नागरिकांचा आपल्या डॉक्टरांवरचा, आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा विश्वास अधिक वाढेल आणि सातत्याने भीतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या नागरिकांना देखील काहीसा दिलासा मिळेल, यासाठी प्रयत्न करा असा सल्ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिला आहे.


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : चीनी व्हायरसच्या प्रादुर्भावातून ठणठणीत बरे झालेल्यांचा आकडा मोठा आहे. त्याला देखील योग्य प्रसिद्धी दिली गेली, तर नागरिकांचा आपल्या डॉक्टरांवरचा, आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा विश्वास अधिक वाढेल आणि सातत्याने भीतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या नागरिकांना देखील काहीसा दिलासा मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिला आहे.

    राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पत्र प्रसिध्द करून लोकांना दिलासा देणाऱ्या बातम्यांना प्रसिध्दी द्यावी असे म्हटले आहे. अर्थात आजार नियंत्रणात आहे हे दाखवलं गेले, तर नागरिक लगेच बाहेर पडतील असा जर समज असेल तर तो चुकीचा आहे आणि ३ मे पर्यंतच्या लॉकडाऊनचं लोकं पालन करतील याविषयी शंका नाहील असेही त्यांनी म्हटले आहे.

    राज्यात करोनाचा कहर कायम आहे. रुग्ण बरे होत असल्याच्या दिलासादायक घटना समोर येण्याबरोबरच रुग्णांचा आकडाही झपाट्यानं वाढत आहे. विशेषत: मुंबई आणि पुण्यामध्ये अनेक वसाहती आणि परिसर करोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर सील करण्यात आले आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात भीतीचं सावट कायम आहे. अगदी हीच बाब मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर टाकली आहे. त्याचबरोबर लोकांच्या मनातील करोना आणि करोनाच्या रुग्णांविषयीची भीती दूर करण्यासाठी सल्लाही राज यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

    राज ठाकरे आपल्या निवेदनात म्हणतात, चीनी व्हायरसविरुध्दमहाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व राज्यातील प्रशासनं दोन हात करत आहेत. बहुसंख्य नागरिक देखील प्रशासनाच्या निदेर्शांचं काटेकोर पालन करत आहेत आणि त्यामुळे या आजाराचा जलदगतीने होणारा प्रसार आपण बऱ्यापैकी रोखू शकलो आहोत आणि आजारातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या देखील आश्वासक आहे. याबद्दल या लढाईत उतरलेल्या प्रत्येकाचं जेवढं कौतुक करावं ते कमीच आहे. याच्याशी निगडित दुसरा भाग म्हणजे एखाद्याला लागण झाली आहे किंवा तशी शक्यता आहे, असं जरी आढळलं तरी त्या व्यक्तीला वाळीत टाकण्याचे प्रकार समोर येत आहेत. हा प्रकार चुकीचा तर आहेच पण तो आपल्या सर्वांना नुकसानकारक ठरेल.

    या आजाराच्या नुसत्या शंकेनं सुद्धा जर एखाद्या व्यक्तीला वाळीत टाकण्याचे प्रकार घडत असतील तर लोकांचा कल त्याची लक्षणं लपवण्याकडे राहिल आणि पयार्यानं लॉकडाऊनसकट केलेल्या अनेक उपाययोजना निष्प्रभ ठरतील. हा आजार संसर्गजन्य आहे हे मान्य पण टी.बी. सारखे अनेक आजार हे संसर्गजन्य असताना देखील आपण त्या रुग्णांना वाळीत टाकलं नाही तर आत्ताच हे का? यावर एकच उपाय म्हणजे या आजारावर मात केली जात आहे, रुग्ण ठणठणीत बरे होऊन बाहेर पडत आहेत याची आकडेवारी देणारं एक न्यूज बुलेटिन आठवड्यातून एकदा सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारनं जारी करावं. माध्यमांनी देखील या मुद्द्याच गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचवावे.
    माझं पुन्हा एकदा जनतेला आवाहन आहे की घाबरून जाऊ नका, पुरेशी काळजी घ्या आणि समाजमाध्यमांवर येणाºया गोष्टींची नीट खातरजमा करा. त्यावर सरसकट विश्वास ठेऊन कोणतीही आततायी कृती करू नका. या सगळ्यांवर मात करून लवकरच जनजीवन पूर्ववत व्हावं हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना, असे ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना सुचवले आहे.

    Related posts

    पनवेलच्या फार्म हाऊसवर सलमान खानला चावला साप, बिनविषारी साप असल्याने बचावला

    ठाकरे – फडणवीस आणीबाणीवरून एकमेकांना भिडले; आणीबाणी लागू करणाऱ्या पक्षातले नेते हसले

    शेतकरी आंदोलनातील हेट स्पिचनंतर योगराज सिंग यांची काश्मीर फाईल्स सिनेमातून हकालपट्टी