विशेष प्रतिनिधी
प्रयागराज : तबलिगी जमातच्या लोकांचे चीनी व्हायरस कोरोना फैलावण्याचे कारस्थान आहे, असा आरोप करणाऱ्या युवकाची कैराळी भागात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सबंधित युवक घरासमोरच उभा असताना दोघेजण मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी युवकाला गोळ्या घातल्या. परंतु, ते पळून जात असतानाच जमावाने पकडून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ताबडतोब या गुन्ह्याची दखल घेऊन दोघांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या दोघांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करून पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे. मृत युवकाच्या कुटुंबीयांसाठी योगींनी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
Chief Minister Yogi Adityanath has taken cognizance of the incident in Kareli, Prayagraj and announced Rs 5 lakhs as compensation for the family of the deceased and ordered strict action and imposition of National Security Act against the accused.
— ANI UP (@ANINewsUP) April 5, 2020