• Download App
    तबलिगी जमातच्या बाजूने नँशनल हेरल्डने "गळा" काढला; म्हणे तबलिगींवरील उपचारांकडे डॉक्टरांचे दुर्लक्ष | The Focus India

    तबलिगी जमातच्या बाजूने नँशनल हेरल्डने “गळा” काढला; म्हणे तबलिगींवरील उपचारांकडे डॉक्टरांचे दुर्लक्ष

    विशेष  प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशभर चीनी व्हायरसचा फैलाव करत फिरलेल्या तबलिगी जमातीच्या लोकांवरील उपचाराबाबत हलगर्जीपणा केला जात असल्याचा “गळा” नँशनल हेरल्डने काढला आहे. तबलिगी बेकायदेशीररित्या निजामुद्दीनच्या मरकजमध्ये जमले. तिथून ते भारतभर फिरले. त्यांच्या संपर्कामुळे देशातील १७ राज्यांमध्ये ३५% कोरोना संसर्ग वाढला. हे काही नँशनल हेरल्डला दिसले नाही. कोरोना फैलाव बनावट आहे. मरायला मशिदीत या. मशिदीतल्या सारखे दुसरे चांगले मरण नाही, अशी प्रवचने झोडणारा तबलिगी जमातचा म्होरक्या मौलाना महंमद साद फरार झाला. याची नँशनल हेरल्डने दखलही घेतली नाही. तबलिगी जमातच्या २५०० लोकांना मरकजमधून बाहेर काढून वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे हे तबलिगी लोक उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सवर थुंकले. आयसोलेशन वॉर्डांमध्ये नागडे फिरले. धर्म तर सोडाच पण माणुसकी सोडून नीचपणाने वागले. पण त्या वेळी नँशनल हेरल्डने डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती. पण आता नँशनल हेरल्डला दिसलेय काय, तर तबलिगी जमातीच्या लोकांना दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश नारायण हॉस्पिटलमध्ये दाखल केले पण अजून त्यांच्यावर उपचारच सुरू झालेले नाहीत. त्यांना अन्न, पाणी देण्यात आलेले नाही. तेथील डॉक्टर, नर्स म्हणे त्यांच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करतात. वरवर पाहता ही बातमी ह्रदयद्रावक वाटते पण ती देखील वस्तुस्थितीचा विपर्यास आहे. त्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या तबलिगींनी बिर्यानीची मागणी केली. याचा बातमीत उल्लेख नाही. बातमी काय आहे, तर उपचारांकडे दुर्लक्ष केले याची…!! याला म्हणतात हेरल्डी पत्रकारिता. नँशनल हेरल्डवर फोर्जरीच्या काही केस चालू आहेत. त्यात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि वड्राही त्यात अडकले आहेत. त्या नँशनल हेरल्डने तबलिगींच्या बाजूने “गळा” काढला आहे.

    Related posts

    पनवेलच्या फार्म हाऊसवर सलमान खानला चावला साप, बिनविषारी साप असल्याने बचावला

    ठाकरे – फडणवीस आणीबाणीवरून एकमेकांना भिडले; आणीबाणी लागू करणाऱ्या पक्षातले नेते हसले

    शेतकरी आंदोलनातील हेट स्पिचनंतर योगराज सिंग यांची काश्मीर फाईल्स सिनेमातून हकालपट्टी