• Download App
    तबलिगींमुळेच देशात चीनी विषाणूच्या संक्रमणात ३० टक्के वाढ | The Focus India

    तबलिगींमुळेच देशात चीनी विषाणूच्या संक्रमणात ३० टक्के वाढ

    तबलिगी जमातीच्या मरकझमुळे देशात चीनी व्हायरस संक्रमणाचा वेग वाढल्याचा धक्कादायक निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे. चीनी व्हायरसची बाधा झालेले रुग्ण देशभरात पंधरा हजारांच्या घरात पोहोचले आहेत. यातील 4 हजार 291 म्हणजेच 29.8 टक्के बाधा झालेले रुग्ण तबलिगीचे कार्यकर्ते किंवा त्यांच्या संपर्कात आलेले आहेत.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : तबलिगी जमातीच्या मरकझमुळे देशात चीनी व्हायरस संक्रमणाचा वेग वाढल्याचा धक्कादायक निष्कर्ष आरोग्य विभागाने केलेल्या अभ्यासात निघाला आहे. देशभरात एकूण 14 हजार 378 चीनी व्हायरसची बाधा झाली आहे. त्यातील यातील 4 हजार 291 म्हणजेच 29.8 टक्के बाधा झालेले तबलिगी जमातीशी संबंधित असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे.

    देशातील चीनी व्हायरसग्रस्त रुग्णांची संख्या वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी मरकझ आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने परदेशी प्रवासी आले होते. लॉकडाऊनच्या काळातही तेथे धार्मिक कार्यक्रम सुरू होते. गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार १३ हजारांवर तबलिगी तेथे जमा झाले होते. येथील तबलिगी कार्यकर्ते देशाच्या सर्व भागात गेले. सुरूवातीला केवळ शहरांपर्यंत मर्यादित असलेला चीनी व्हायरस त्यामुळे ग्रामीण भागातही पोहोचला. त्यामुळे सरकारच्या उपाययोजनांनाही मर्यादा आल्या.

    तबलिगी जमात मरकझच्या पूर्वी सात दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट होत होती. आत ती चार दिवसांत दुप्पट होत आहे. अद्यापही या मरकझमध्ये सहभागी झालेल्या अनेकांचा ठावठिकाणा लागलेला नाही. काही जण पळून गेले आहेत. त्यामुले त्यांच्याकडून इतरांना लागण होण्याची भीती अद्याप कायम आहे. तबलिगी जमातचा हा कार्यक्रम झाला नसता तर रुग्ण दुप्पट होण्याचा वेग आणखी कमी झाला असता. ७ ते ८ दिवसांत एक रुग्ण समोर आला असता. देशाच्या अनेक भागांत सापडलेल्या रुग्णांत तबलिगी जमातशी संबंधितांचे प्रमाण अधिक आहे.

    तबलिगी जमातीने देशातील २३ राज्यांत चीनी व्हायरसचा संसर्ग वाढविला. तमिळनाडूत 84 टक्के, दिल्लीत 63 टक्के, आंध्रप्रदेशात 61 टक्के आणि उत्तर प्रदेशातील 59 टक्के रुग्ण हे तबलिगी जमातीच्या संपर्कात आलेले होते. धर्मांध असलेल्या या तबलिगींनी सुरवातीला क्वारंटाईन होण्यासही नकार दिला होता. उपचार करुन घेण्यास किंवा तपासणी करुन घेण्यास त्यांनी विरोध दर्शवला होता. मशिदीमध्ये गेल्यानंतर आमचे संरक्षण होईल, अशी अवैज्ञानिक भूमिका या लोकांनी घेतली होती.

    Related posts

    पनवेलच्या फार्म हाऊसवर सलमान खानला चावला साप, बिनविषारी साप असल्याने बचावला

    ठाकरे – फडणवीस आणीबाणीवरून एकमेकांना भिडले; आणीबाणी लागू करणाऱ्या पक्षातले नेते हसले

    शेतकरी आंदोलनातील हेट स्पिचनंतर योगराज सिंग यांची काश्मीर फाईल्स सिनेमातून हकालपट्टी